Chandrayaan-3 : चंद्रावर ‘विक्रम’! या शेअर्सनी पण केला रेकॉर्ड

Chandrayaan-3 : भारताने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक महासत्तांना तोंडात बोट घालायला लावलेच. भारताने चंद्रावर विक्रम केला. या प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या कंपन्यांनी शेअर बाजारात पण रेकॉर्ड केला. त्यांनी अपेक्षेप्रमाणे मोठी उसली घेतली.

Chandrayaan-3 : चंद्रावर 'विक्रम'! या शेअर्सनी पण केला रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 8:45 AM

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : चंद्रावर भारताने विक्रम केला. विक्रम लँडर बुधवारी, 23 ऑगस्ट 2023 रोजी सांयकाळी 6:04 मिनिटांनी यशस्वीपणे उतरले. भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा (Chandrayaan 3 Landing) भारत हा जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेत अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांचे शेअर चांगली कामगिरी करतील, ही अपेक्षा शेअर बाजाराला (Share Market) गेल्या काही दिवसांपासून होती. त्यानुसार, काल बाजारात या शेअर्संनी चमकदार कामगिरी बजावली. या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. या शेअर्संनी बाजारात रेकॉर्ड केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना चंद्रयान-3 मोहिमेचा द्विगुणित आनंद झाला. हे शेअर आता अजून धावतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने भविष्यात अनेक मोहिमा आखल्या आहेत. त्याचा फायदा या कंपन्यांना नक्कीच होणार आहे.

या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा

चंद्रयान मोहिमेबाबत अवघा देश एक झाला होता. सॉफ्ट लँडिंगसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. प्रार्थना सुरु होत्या. अपेक्षेप्रमाणे सॉफ्ट लँडिंग झाले. लँडर विक्रम उतरले आणि त्यासोबतचे रोव्हर प्रज्ञान पण उतरले. शेअर बाजाराचे संपूर्ण लक्ष या घडामोडींकडे होते. विमान, अंतराळ आणि रक्षा क्षेत्र, एअरोस्पेस, अंतराळ तंत्रज्ञान, इंधनपूर्ती, इलेक्ट्रॉनिक्स, तांत्रिक उत्पादनं करणाऱ्या कंपन्या यांच्यावर या घडामोडींचा थेट परिणाम दिसून आला. या क्षेत्रातील शेअरमध्ये मोठी उलथापालथ झाली.

हे सुद्धा वाचा

14.91 टक्के उसळी

  1. चंद्रयान मोहिमेत सहभागी सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने 14.91 टक्क्यांची उसळी घेतली
  2. पारस डिफेंस अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या शेअर 5.47 टक्क्यांनी वधारला
  3. एमटीएआर टेक्नोलॉजीजच्या शेअरने 4.84 टक्क्यांची सलामी दिली
  4. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये 3.57 टक्क्यांची तेजी दिसून आली
  5. रक्षा क्षेत्राशी संबंधित भारत फोर्ज कंपनीचा शेअर 2.82 टक्क्यांनी वधारला
  6. अस्त्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्स कंपनीचा शेअर 1.72 टक्क्यांनी वाढला
  7. लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये 1.42 टक्क्यांची तेजी आली.
  8. बाजारातील ट्रेडिगदरम्यान हे शेअर या वर्षांतील उच्चांकावर पोहचले होते

कमाईच कमाई

2040 पर्यंत भारताची मून इकॉनॉमी जोरदार असेल. चंद्राची अर्थव्यवस्थेत भारत आता अग्रेसर होईल. त्यामाध्यमातून मोठी कमाई साधता येईल. जवळपास 4200 कोटींची कमाई होण्याचा अंदाज आहे. चंद्रापर्यंत जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यवस्था झालेली असेल. त्यामाध्यमातून नियमीत कालावधीत यान ये-जा करतील. ही दळणवळण व्यवस्था 42 अब्ज डॉलरवर पोहचेल. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या शेअर बाजारात दादा असतील हे वेगळं सांगायला नको.

भारताला मोठी संधी

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झेंडा रोवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भविष्यात इतर देश मोहिमा आखतील. तोपर्यंत भारताला मोठी संधी आहे. अमेरिका, रशिया आणि चीनने यापूर्वी चंद्रावर स्वारी केली आहे. पण दक्षिण ध्रुवावर त्यांना मजल मारता आलेली नाही. रशियाचा आताचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे अवकाश आणि अंतराळ क्षेत्रात भरारी घ्यायला भारताला मोठी संधी आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.