नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : आज बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जवळपास 6 वाजता ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान-3 कडे (Chandrayaan-3) लागलेले आहे. चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल. या मिशनच्या यशासाठी अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले आहे. तर यावेळेस लाखो-कोट्यावधी गुंतवणूकदारांचे लक्ष दोन मोहिमांवर राहील. चंद्रावरच्या घडामोडींमुळे त्यांना पृथ्वीवर मोठा फायदा होणार आहे. चंद्रयान-3 चंद्रावर लँड झाल्यावर या 6 कंपन्यांचे शेअर बाजारात (Share Market) रॉकेट होऊ शकतात. भारत सरकारच्या या महारत्न कंपन्या गुंतवणूकदारांना लॉटरी लावू शकतात. हे मिशन यशस्वी झाले तर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो. कोणते आहेत हे शेअर?
लार्सन अँड टुब्रो
लार्सन अँड टुब्रो हा जागतिक समूह इन्फ्रा, हायड्रोकार्बन, पॉवर, प्रोसेस इंडस्ट्री, डिफेंस, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फायनेन्शिअल सेवा देतो. चंद्रयान मिशनसाठी कंपनीने ग्राऊंड आणि कम्पोनेट उपलब्ध करुन दिले आहेत. या कंपनीचा शेअर 2679.50 रुपयांवर मंगळवारी बंद झाला होता. एका महिन्यात कंपनीने जवळपास 3 टक्के परतावा दिला आहे. या वर्षांत कंपनीने 28 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स विमान आणि हेलिकॉप्टरची निर्मिती, देखभाल, दुरुस्तीचे काम करते. नॅशनल एअरोस्पेस लॅबॉरेटीजसाठी ही कंपनी आधार होऊ शकते. मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्के तेजी दिसून आली. हा शेअर 3891 रुपयांवर बंद झाला होता. यावर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 53.24 टक्के परतावा दिला आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स एक इंटिग्रेटिड पॉवर प्लँट आहे. ही कंपनी पॉवर, ट्रान्समिशन, ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्री, डिफेंस अशा अनेक क्षेत्रात उत्पादन तयार करते. ही कंपनी डिझाईन, इंजिनिअरिंग, निर्मिती, चाचणी आणि इतर अनेक सेवा पुरविते. या कंपनीने चंद्रयान मिशनसाठी बॅटरी आणि इतर कंपोनेंट उपलब्ध करुन दिले. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये 10.11 टक्के तेजी दिसून आली. हा शेअर 111.05 रुपयांवर बंद झाला. एका महिन्यात कंपनीने 13 टक्के तर वर्षभरात 38 टक्के परतावा दिला आहे.
पारस डिफेंस अँड स्पेस टेक्नॉलॉजीज
पारस डिफेंस अँड स्पेस टेक्नॉलॉजीज ही कंपनी चंद्रयान मिशनमधील प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. मंगळवारी या कंपनीचा शेअर 0.85 टक्के तेजीसह 680.40 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कोणताच परतावा दिला नाही. या वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा दिला आहे.
एमटीएआर टेक्नोलॉजीज
एमटीएआर टेक्नोलॉजीज ऊर्जा, परमाणु, स्पेस, एअरोस्पेस, डिफेंस आणि इतर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजसाठी सेवा पुरवते. चंद्रयानचे इंजिन निर्मिती आणि इतर प्रकल्पात कंपनीचा सहभाग होता. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये 0.84 टक्क्यांची घसरण झाली. हा शेअर 2118.20 रुपयांवर बंद झाला. या वर्षांत शेअरने 30 टक्के परतावा दिला.
वालचंदनगर इंडस्ट्रीज
वालचंदनगर इंडस्ट्रीज ही इंजिनिअरिंग उत्पादनं आणि सेवा, तसेच इतर अनेक अवजड उद्योगात मांड ठोकून आहे. चंद्रयान मिशनसाठी कंपनींने कंपोनेंटचा पुरवठा केला होता. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये दोन टक्के घसरण होऊन तो 101.50 रुपयांवर बंद झाला. एका महिन्यात 8 टक्के तर वर्षभरात कंपनीने 47 टक्के परतावा दिला.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स ही कम्युनिकेशन, एअरोस्पेस, ट्रान्सपोर्ट आणि इतर सेवा देणारी कंपनी आहे. मंगळवारी या कंपनीचा शेअर 2.58 टक्के तेजीसह 1432.30 प्रति शेअरवर बंद जाला. एका महिन्यात कंपनीने 4 टक्के तर वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने वर्षभरात 105 टक्के परतावा दिला आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.