Aadhaar-pan linking : आजपासून ‘या’ नियमांमध्ये बदल; क्रिप्टोवर लागणार टीडीएस, तर आधार-पॅन लिंकिंगसाठी मोजावी लागणार दुप्पट रक्कम

आजपासून म्हणजेच एक जुलै 2022 पासून बँकिंग (Banking), आर्थिक (Financial) तसेच व्यवसायिक क्षेत्रांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. या बदलांमुळे तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या नव्या नियमांबाबत.

Aadhaar-pan linking : आजपासून 'या' नियमांमध्ये बदल; क्रिप्टोवर लागणार टीडीएस, तर आधार-पॅन लिंकिंगसाठी मोजावी लागणार दुप्पट रक्कम
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 9:13 AM

मुंबई : आजपासून म्हणजेच एक जुलै 2022 पासून बँकिंग (Banking), आर्थिक (Financial) तसेच व्यवसायिक क्षेत्रांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. या बदलांमुळे तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या नव्या नियमांबाबत. आजपासून पॅन आणि आधार लिंकिंग (Pan-Aadhaar card linking) करणे आणखी महाग झाले आहे. केंद्र सरकारने पॅन आणि आधारच्या लिंकिंगसाठी 31 मार्च 2023 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. मुदतवाढ देताना केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते की, जर तुम्ही 30 जून 2022 पूर्वी आधारला पॅन लिंक करत असाल तर तुम्हाला 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. मात्र तुम्ही जर 30 जून 2022 नंतर आधारला पॅन लिंक केले तर तुम्हाला त्यासाठी 1 हजार रुपये मोजावे लागतील. आज एक जुलै 2022 असल्यामुळे आजपासून आधारला पॅन लिकं करण्यासाठी आता तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही 31 मार्च 2023 नंतर देखील आधाराला पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रीय होऊ शकते.

क्रिप्टो व्यवहारांवर टीडीएसची कपात

आजपासून क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर एक टक्का इतका डीडीएस कपात केला जाणार आहे. मात्र हे व्यवहार जर 10,000 रुपयांच्या वर असतील तरच डीटीएस द्यावा लागणार आहे. आयकर विभागाकडून क्रिप्टोवर आकारण्यात येणाऱ्या डीटीएस कपातीबाबत तपशीलवार मार्गदर्शन तत्वे जारी करण्यात आली आहेत.

…तर ट्रेडिंग खाते बंद होणार

जर तुम्ही अद्यापही तुमच्या डीमॅट ट्रेडिंग खात्याची केवायसी केली नसेल तर आजपासून तुमचे ट्रेडिंग खाते बंद होणार आहे. डीमॅट खात्याच्या केवायसीसाठी 30 जूनची मुदत देण्यात आली होती. पूर्वी डीमॅट खात्याच्या केवायसीसाठी 31 मार्च 2022 पर्यंतचीच मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही मुदत वाढून 30 जून 2022 करण्यात आली. जर तुम्ही अजूनही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेत तर तुमचे डीमॅट खाते बंद केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

नवे लेबर कोड

नव्या लेबर कोडमुळे कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. सॅलरी, सुट्या, पीएफच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, नवे लेबर कोड आजपासून लागू करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र अद्याप केंद्र सरकारच्या वतीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गॅस सिलिंडर स्वस्त झाले

महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात देखील व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 136 रुपयांची कपात करण्यात आली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.