PAN-Aadhaar : देशात उद्यापासून होणार बदल, 4 नवीन कामगार कायदे लागू, पॅन-आधार लिंक करण्यासाठी दुप्पट दंड
500 रुपयांच्या दंडासह पॅन-आधार लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एक जुलैपासून या दंडात दुपटीनं वाढ होणार आहे. म्हणजे पॅन-आधार लिंक करण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागतील. एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई : 1 जुलैपासून देशातील जनतेला बदल पाहायला मिळतील. क्रिप्टोकरन्सीच्या ट्रान्झेक्शनवर एक टक्का डीडीएस लागू होईल. एअर कंडीशनर खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागेल. जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला काही बदल दिसून येतील. देशात चार नवीन कामगार कायदे लागू होणार आहेत. याशिवाय टीडीएसच्या (TDS) नियमातही (Rules) बदल होणार आहेत. क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) सरकारकडून 30 टक्के कर लावण्यात आला. एक जुलैपासून आणखी एक झटका देण्यात येत आहे. क्रिप्टोकरन्सीवर एक टक्के टीडीएस लावण्यात येणार आहे. मग क्रिप्टो विक्रीत फायदा असो की, नुकसान. या निर्णयामुळं क्रिप्टोकरन्सी खरेदी-विक्री करणारे सरकारच्या देखरेखीत राहतील.
भेटवस्तूंवर 10 टक्के टीडीएस
1 जुलैपासून भेटवस्तूंवर 10 टक्के कर (टीडीएस) द्यावा लागणार आहे. हा कर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि डॉक्टरांवर लागू राहील. डॉक्टरांना मिळणाऱ्या मोफत औषधी, सॅम्पल, विदेशी फ्लाईट तिकीट तसेच इतर महाग वस्तूंसाठी हा नियम राहील.
एअर कंडीशनर खरेदी करणारे महागणार
जुलैपासून एअर कंडीशनर खरेदी करणे महाग होणार आहे. बीईईने एअर कंडीशनरच्या एनर्जी रेटिंग नियमात बदल केला आहे. हा बदल एक जुलैपासून लागू होईल. यानुसार, जुलै महिन्याच्या एक तारखेपासून फाईव्ह स्टार एसीची रेटिंग फोर स्टार होईल. यामुळे देशात एडीच्या किमतीत 10 टक्के वाढ होईल.
पॅन-आधार लिंक न झाल्यास दुप्पट दंड
500 रुपयांच्या दंडासह पॅन-आधार लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एक जुलैपासून या दंडात दुपटीनं वाढ होणार आहे. म्हणजे पॅन-आधार लिंक करण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागतील. एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.
नवीन कामगार कायदा लागू होणार
एक जुलैपासून कामगार कायद्याचे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. यामुळं हातात येणारी रक्कम, कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळ, पीएफचे योगदान, ग्रॅच्युईटी यावर परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांना चार दिवस 48 तास म्हणजे रोज 12 तास काम करावं लागेल. परंतु, यात राज्यानुसार बदल होऊ शकतो.