चार्ली मुंगेर यांच्या मते क्रिप्टोकरन्सी ही बाल वेश्याव्यवसायाइतकीच वाईट, हॉट डील मिळताच लोकं नैतिकता सोडतात
क्रिप्टो करंसीला अनेक जण पसे कमविण्याचा शॉर्टकट मार्ग म्हणून बघतात. उद्योजक मुंगेर यांनी क्रिप्टोला बाल वेश्याव्यवसायाची उपमा दिली आहे.
मुंबई, क्रिप्टो मार्केटमध्ये (cryptocurrency) नुकत्याच झालेल्या उलथापालथीबद्दल बोलताना, बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर (Charlie Munger) यांनी त्याची तुलना बाल वेश्याव्यवसायाशी (Child Prostitution) केली. मुंगेर म्हणाले, जेव्हा ‘हॉट डील्स’चा प्रश्न येतो तेव्हा काही लोकं त्यांची नैतिकता सोडून त्यावर तुटून पडतात. बाल वेश्याव्यवसाय असो किंवा बिटकॉइन असो, विशिष्ट विभागासाठी काही फरक पडत नाही. जर सौदा गरम असेल तर ते ते जाऊ देऊ इच्छित नाहीत. बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. ते सुरुवातीपासून क्रिप्टोकरन्सीच्या समर्थनात नव्हते. ते क्रिप्टोला ‘शिट’ आणि क्रिप्टोकरन्सीचे प्रवर्तक ‘स्कम बॉल्स’ म्हणतात.
क्रिप्टो सभ्यतेच्या अधोगतीला कारणीभूत
एका ताज्या मुलाखतीत 98 वर्षीय चार्ली मुंगेर यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच मुलाखतीत, त्यांनी अलीकडेच क्रिप्टो एक्सचेंज एफटीएक्स आणि त्याचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांच्या दिवाळखोरीबद्दल काही टिप्पण्या केल्या. ते म्हणाले की, हे लोकं अशा गोष्टींना हवा देत आहेत. वास्तविक हे लोकं सभ्यतेच्या अधोगतीला चालना देत आहेत. FTX ने अलीकडेच दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे, ज्यामुळे क्रिप्टोकरन्सी उद्योगाच्या भविष्याविषयी भीती निर्माण झाली आहे.
लोक त्यांची प्रतिष्ठा गमावत आहेत
मुंगेर केवळ क्रिप्टो उद्योगाच्या विरोधात नाही, तर त्यांचा असाही विश्वास आहे की, लोकं कोणत्याही प्रकारे आपली संपत्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आपली प्रतिष्ठा गमावत आहेत. मुंगेर यांच्या मते, प्रतिष्ठा आर्थिक जीवनात खूप उपयुक्त आहे. पैसे कमविण्याचा शॉर्टकट मार्ग म्हणून क्रिप्टोकडे अनेक जण बघत आहेत. हा शॉर्टकट लोकांना अधोगतीकडे घेऊन चालला आहे.