Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Update : सोने खरेदीदारांना ‘लॉटरी’, आता इतक्या कमी भावात करा खरेदी

Gold Silver Price Update : सोने -चांदीने गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकांना धक्का दिला. खरेदीदारांनी त्यामुळे बाजाराकडे पाठ फिरवली आहे. आज खरेदीदारांना खरेदीची सुवर्ण संधी आहे.

Gold Silver Price Update : सोने खरेदीदारांना 'लॉटरी', आता इतक्या कमी भावात करा खरेदी
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 9:37 AM

नवी दिल्ली : सोने आणि चांदीचे भाव गेल्या एक दोन महिन्यांपासून सातत्याने आगेकूच करत आहेत. या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान या भावांमध्ये थोडीफार घसरण होते. पण ही घसरण काही काळासाठी असते. अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आली आहे. या दमकोंडीमुळे डॉलर घसरला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Update) भडकल्या आहेत. सध्या सोन्या-चांदीचे दर ऐतिहासिक स्तरावर आहेत. ग्राहकांना घसरणीचा फायदा घेता येतो. त्यांना आज स्वस्तात दागिने खरेदीची मोठी संधी आहे.

भाव आता सोमवारी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति तोळा 55,950 रुपये आहे तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,020 रुपये आहे. 110 रुपयांची प्रति तोळा घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळी सोने- चांदीचे भाव जाहीर झाले नाहीत. काल एक किलो चांदी 76,600 रुपये होती. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. आता भाव सोमवारी जाहीर करण्यात येईल.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 24 कॅरेट सोने 158 रुपये स्वस्त होऊन 60623 रुपये, 23 कॅरेट सोने 158 रुपये स्वस्त होऊन 60380 रुपये, 22 कॅरेट सोने 144 रुपये सस्त झाले. याचा भाव 55531 रुपये, 18 कॅरेट सोने 119 रुपये स्वस्त झाले. याची किंमत 45467 रुपये तर 14 कॅरेट सोने 90 रुपया सस्त होऊन 35467 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीपण स्वस्त सर्वकालीन भावापेक्षा सोने 158 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. सोने 5 एप्रिल 2023 रोजी प्रति तोळा 60,781 रुपये होते. तर चांदी 79,980 रुपये प्रति किलो होती. सध्या चांदीचा भाव 76,600 रुपये आहे. चांदी पण स्वस्त झाली आहे.

शुद्ध सोन्याची हमी सोन्याची हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेची हमी देते. त्यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे सोने याच्यातील फरक, तफावत लक्षात येते. देशात सोन्याच्या शुद्धतेसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी आता 22 कॅरेट सोन्याचा वापर, उपयोग करणे आवश्यक आहे. हे सोने 91.6 टक्के शुद्ध असते. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

किती शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.