Insurance Policy : 45 पैशांत, 10 लाखांचा विमा; देशातील या सर्वात स्वस्त इन्शुरन्सची माहिती आहे का?
Cheapest Insurance Policy : पूर्वी ही विमा पॉलिसी 35 पैशांमध्ये मिळत होती. आता तिची किंमत 45 पैसे इतकी झाली आहे. हा देशातील सर्वात सर्वात स्वस्त विमा असल्याचा दावा करण्यात येतो. काय आहे या विमा पॉलिसीचं वैशिष्ट्य?
जर तुमच्यावर मोठ्या जबाबदार्या असतील, तुमचा कुटुंब कबिला छोटा अथवा मोठा असेल तर तुमच्याकडे एक जीवन विमा योजना (Life Insurance Policy) असणे आवश्यक आहे. अर्थात कोणती विमा पॉलिसी घ्यावी आणि कोणती घेऊ नये यावर अनेकांची गाडी अडते. त्यांना पॉलिसीची निवड करणे अवघड जाते. पण तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त विमा पॉलिसी माहिती आहे का? ही विमा पॉलिसी तुम्हाला अवघ्या 45 पैशांमध्ये मिळेल. पूर्वी ही विमा पॉलिसी 35 पैशांमध्ये मिळत होती. आता तिची किंमत 45 पैसे इतकी झाली आहे. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. कव्हर मिळते.
कोणती आहे ही योजना
तर ही विमा योजना IRCTC कडून देण्यात येणारी Travel Insurance Policy आहे. जेव्हा तुम्ही ट्रेनसाठी तिकीट बुक करता. त्यावेळी प्रवाशाला विमा पॉलिसी पण मिळते. जर रेल्वे प्रवासादरम्यान जर एखादा अपघात घडला, त्यात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, तो गंभीररित्या जखमी झाल्यास, त्याला अपंगत्व आल्यास त्याला या प्रवाशी विमा योजनेतून नुकसान भरपाई देण्यात येते.
पूर्वी ही पॉलिसी अवघ्या 35 पैशांना मिळत होती. तर आता त्यात 10 पैशांची वाढ झाली आहे. ही पॉलिसी सध्या 45 पैशांना मिळते. ही देशातील सर्वात स्वस्त विमा पॉलिसी असल्याचा दावा करण्यात येतो. अर्थात ही पॉलिसी अवघ्या काही तासांसाठी असते. तिची मुदत काही तासांसाठी असते. प्रवाशी गंतव्य, त्याच्या प्रवासाच्या इच्छित स्थळी पोहचल्यावर ही पॉलिसी संपते.
किती आणि कसे मिळते विमा संरक्षण
IRCTC ची ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीतंर्गत तीन प्रकारचे विमा संरक्षण मिळते. जर रेल्वे अपघात झाला, त्यात प्रवाशाचा मृत्यू ओढावला तर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. जर प्रवासी अपघातात अपंग झाला तर त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कव्हरेज मिळेल. तात्पुरते अपंगत्व आल्यास 7.50 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळते. जर रेल्वे अपघातात तुम्ही जखमी झाला तर या योजनेतंर्गत 2 लाखांपर्यंतची मदत देण्यात येते.