टाटा ग्रुप चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पाहा किती आहे पगार ? एका वर्षांत किती झाली कमाई, आकडेवारी पाहून धक्का बसेल
टाटा सन्सच्या इतर संचालकांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कमिशन म्हणून प्रत्येकी 2.8 कोटी रुपये मोबदला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : टाटा उद्योग समूहाचे देशातील प्रगतीत स्वातंत्र्यकाळापासून योगदान आहे. रतन टाटा टाटा सन्स कंपनीचे चेअरमन आहेत. टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना आर्थिक वर्षे 2022-23 साठी तब्बल 113 कोटी मानधन मिळाले असून त्यात 100 कोटी नफाचे कमिशन म्हणून देण्यात आले असल्याचे वार्षिक अहवाल 2022-23 मध्ये नमूद केले आहे. 60 वर्षीय चंद्रशेखर यांना साल 2021-22 मध्ये त्यांच्या सेवेबद्दल 109 कोटी रुपये मोबदला देण्यात आला होता.
टाटा सन्सच्या वार्षिक अहवालानूसार टाटा सन्सचे एक्झुकेटिव्ह डायरेक्टर सौरभ अग्रवाल यांना एकूण मोबदला म्हणून 27.82 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यात त्यात 22 कोटी त्यांना कमिशन म्हणून देण्यात आले होते. एन. चंद्रशेखरन यांना साल 2022-23 मध्ये इतर भत्त्यांसह बेसिक सॅलरी 5.56 कोटी रुपये होती असे अहवालात म्हटले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ) त्यांच्या उच्च अधिकार्यांना पगार, लाभ, अनुलाभ आणि भत्ते ( निश्चित घटक) आणि कमिशन ( व्हेरिएबल घटक ) द्वारे मोबदला देत असते. व्हेरिएबल पे, परफॉर्मन्स पे चांगले समजले जातात ते प्रामुख्याने कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतात.
इतर संचालकांचे पगार काय ?
टाटा सन्सच्या इतर संचालकांमध्ये हरिष मनवाणी, विजय सिंह, भास्कर भट, लिओ पुरी आणि रल्फ स्पेथ यांना आर्थिक वर्ष 23 मध्ये प्रत्येकी कमिशन म्हणून 2.8 कोटी रुपये मोबदला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तर साल जुलै 2022 मध्ये स्वतंत्ररित्या नेमणूक झालेल्या संचालक अनिता जॉर्ज यांना 2.1 कोटी रुपये वेतन देण्यात आले आहे.