Fraud : बोगसगिरीचा कळस, बोगस बँक केली सुरु, 3000 जणांना घातला गंडा.. पोलिसांच्या सापळ्यात असा अलगद अडकला..

Fraud : एका पठ्याने चक्क बोगस बँकच सुरु केली आणि पुढे जे झाले ते वाचाच.

Fraud : बोगसगिरीचा कळस, बोगस बँक केली सुरु, 3000 जणांना घातला गंडा.. पोलिसांच्या सापळ्यात असा अलगद अडकला..
पठ्याने केला कहरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 2:55 PM

नवी दिल्ली : शहरात नवीन बँक (Bank) सुरु झाली आणि खाते उघडण्यासाठी जोरदार ऑफर (Offers) असतील तर एकदा शहानिशा कराच. कारण एका पठ्याने चक्क बोगस बँक (Bogus Bank) सुरु केली. तिच्या 9 शाखाही सुरु केल्या. अनेकांना चूना लावला. त्याचे हे मायाजाल वाढण्याअगोदरच पोलिसांनी (Police) त्याला अलगद उचलले..

तर फसवणुकीचा हा प्रकार तामिळनाडू राज्यात उघड झाला. या प्रकाराने पोलिसही चक्रावले. तर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला. चक्क बोगस बँकेत आपले खाते असल्याचे समजल्यावर गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.

ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत. एटीएम फ्रॉड, फोन करुन फसवणूक, अॅपच्या मदतीने फसवणुकीचे प्रकार आपण आजुबाजूला पाहतोच. पण या पठ्याने केलेला हा प्रकार धक्कादायकच नाही तर प्रशासनालाही घाम फोडणार आहे..

हे सुद्धा वाचा

ग्रामीण आणि शेतकी शेतकरी सहकारी बँक (Rural and Agricultural Farmers Cooperative Bank) असे या बनावट बँकेचे नाव आहे. आतापर्यंत बनावट कागदपत्रे, सिम, पासबूक, खाते, नोटा असे प्रकार होत होते. येथे तर बँकचं बनावट असल्याचे उघड झाले.

700 रुपये भरुन या बनावट बँकेत खाते उघडता येत होते. खाते उघडल्यावर ग्राहकांना क्रेडिट-डेबिट कार्ड ही देण्यात येत होते. तसेच इतर बँकेसारख्याच सुविधाही देण्यात येत होत्या. या बँकेत 3000 जणांनी खाते उघडले होते.

रिझर्व्ह बँकेच्या AGM ने बँकेविरोधात तक्रार दिली होती. केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) याप्रकरणी सखोल तपास केला. त्यानंतर या बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड चंद्रबोस याला अटक केली.

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीकडून 56.6 लाख रुपये रोख, Deposit Slip, Withdrawal Slip, रक्कम जमा आणि काढण्याच्या स्लीप जमा केल्या. बँकेतून रोख मोजण्याच्या मशिनही ताब्यात घेण्यात आल्या.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.