देशी थाळीला चायनीज तडका, Tata खरेदी करणार ही कंपनी

Tata Noodles Market | आपल्या घरात टाटाचं मीठ कित्येक वर्षांपासून येत आहे. त्यानंतर चहा, कॉफी, डाळी, मसाले आणि इतर अनेक खाद्यपदार्थ आपल्या घरात येऊन पोहचले आहेत. आता टाटा या थाळीत चायनीज आयटम जोडणार आहे. देशी चायनिजला टाटांचा लवकरच तडका लागणार आहे. टाटा बाजारात Maggi ला टक्कर देणार आहे.

देशी थाळीला चायनीज तडका, Tata खरेदी करणार ही कंपनी
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 2:02 PM

नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : टाटा समूह तुमच्या दैनंदिन थाळीत मीठापासून मसालापर्यंत, तर चहापासून ते कॉपीपर्यंत अनेक गोष्टी घेऊन आले आहेत. तुम्ही किचनमधील वस्तूंवर बारीक नजर टाकली तर टाटाचे कोणते उत्पादनं तुमच्या घरात आणली जात आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल.नाष्ट्यात रेडी टू कुक अशा रेसिपीज् आणि डाळी सुद्धा टाटाच्या फूड फॅमिलीत जोडल्या गेल्या आहेत. मसाल्याच्या रुपाने टाटाने आपल्या जेवणाची लज्जत वाढवली आहे. आता टाटा यामध्ये चायनीजचा तडका लावणार आहे. टाटा बाजारात मॅगी नूडल्सला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कोणत्या कंपन्या येत आहेत टाटा समूहात?

या दोन फूड कंपन्या पंखाखाली

दोन फूड कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची तयारी टाटा समूहाने केली आहे. यामध्ये एक कंपनी कॅपिटल फूड्स आहे. तर दुसरी कंपनी ऑर्गेनिक इंडिया ही आहे. कॅपिटल फूड्स ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ सारख्या ब्रँडची मालक आहे. तर ऑर्गेनिक इंडिया ग्रीन टी सारखे उत्पादने विक्री करते. यामध्ये फॅब इंडियाची पण गुंतवणूक आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या कोटींची उलाढाल

  • टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड कॅपिटल फूड्समध्ये, त्यांच्या गुंतवणूकदारांकडून 75% वाटा खरेदी करत आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक अध्यक्ष अजय गुप्ता यामधील त्यांचा 25% वाटा कायम ठेवतील. कंपनीचे मूल्यांकन 5100 कोटींच्या घरात आहे. हा करार 3,825 कोटी रुपयात होण्याची दाट शक्यता आहे.
  • ऑर्गेनिक इंडियामध्ये पण टाटा समूह अधिकांश हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या डीलसाठी ऑर्गेनिक इंडियाचे मूल्यांकन 1800 कोटी रुपये लावण्यात आले आहे. या दोन्ही खरेदीविषयी पुढील आठवड्यात टाटा समूह अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता आहे. अद्याप याविषयी कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

‘मॅगी’ला देणार टक्कर

कॅपिटल फूड्सच्या अधिग्रहणानंतर टाटा समूहाची इन्स्टंट नूडल्स मार्केटमध्ये ग्रँड एंट्री होईल. ‘स्मिथ अँड जोन्स’ पोर्टफोलिओत सध्या ‘अद्रक-लसून पेस्ट’, ‘केच-अप’ आणि ‘इन्स्टंट नूडल्स’ आहेत. यासोबतच बाजारात टाटा समूहाचा थेट सामना नेस्लेच्या ‘मॅगी’शी होईल. मॅगी सध्या बाजारात दादा आहे. तिचा बाजारातील हिस्सा 60% इतका आहे. तर या सेगमेंटमध्ये येप्पी, टॉप रेमन, वाई-वाई आणि पतंजली हे मोठे खेळाडू आहेत. इन्स्टंट नूडल्सचा बाजार जवळपास 5,000 कोटींचा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.