Cipla Deal : ही नावाजलेली औषधी कंपनी विक्रीच्या तयारीत, जाणून घ्या कोण आहे नवीन मालक
Cipla Deal : स्वातंत्र्यपूर्व काळातील ही औषधी कंपनी विक्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याविषयीचे भाष्य केले आहे. ही कंपनी हा औषधी ब्रँड खरेदी करणार आहे.
नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झालेली सिप्ला (Cipla) ही औषध कंपनी विक्री होण्याच्या तयारीत आहे. या कंपनीच्या डीलवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. देशातील प्रमुख औषधी निर्मिती कंपनी सिप्लाची खरेदी ब्लॅकस्टोन (Blackstone) ही कंपनी करणार आहे. या कंपनीचे देशातील राजकीय , आर्थिक आणि सामाजिक इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्यांनी एका वृत्ताचा दाखला देत, त्यांनी या डीलवर मन मोकळं केलं. ब्लॅकस्टोन हा जगातील सर्वात मोठा खासगी इक्विटी फंड (Private Equity Fund) आहे. या फंडने सिप्लातील प्रमोटर्सचा 33.47 टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरु केली आहे.
काय आहे घडामोड
काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. देशातील सर्वात जुनी औषधी निर्मिती कंपनी विक्री होत असल्याने मन दाटल्याचे त्यांनी सांगितले. ब्लॅकस्टोन हा जगातील सर्वात मोठा खासगी इक्विटी फंड आहे. तो ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सिप्लातील प्रमोटर्सचा 33.47 टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरु केली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवात
सिप्लाची सुरुवात 1935 मध्ये ख्वाजा अब्दुल हामिद यांनी केली होती. ख्वाजा अब्दुल हामिद यांच्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी सीएसआईआर (CSIR) स्थापण करण्यात प्रमुख भूमिका बजावली.
राष्ट्रवादाचे प्रतिक
जयराम रमेश यांनी सिप्ला ही राष्ट्रवादाचे प्रतिक असल्याचे सांगितले. ख्वाजा अब्दुल हामिद यांचा मुलगा युसूफ हामिद यांनी स्पिलातून कमी किंमतीत जेनेरिक औषधे अनेक देशात पुरवली. या कंपनीने अमेरिका, जर्मनी, इंग्लंड यांच्या एकाधिकारशाही आणि पेटेंट धोरणाला जोरदार विरोध केला. युसूफ हामिद यांनी इतर भारतीय कंपन्यांसाठी रस्ता प्रशस्त केल्याचे मत जयराम रमेश यांनी मांडले.
अदानी समूहाची भरारी
आता अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटने आणखी एक सिमेंट कंपनी खिशात घातली. या कंपनीने 5,000 कोटी रुपयांची मोठा करार (Adani Group Mega Deal) केला. या अधिग्रहणाची माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले. सांघी इंडस्ट्रीजमध्ये अदानी समूहाने मोठा हिस्सा खरेदी केली. सांघी इंडस्ट्रीज (Sanghi Industries) पश्चिम भारतातील मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे.
56.74 टक्के हिस्सा खरेदी
हा करार पूर्ण झाल्यावर गौतम अदानी यांनी ट्विट केले. अंबुजा सिमेंट 2028 पर्यंत सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अदानी पोर्टफोलिओत आता सांघी इंडस्ट्रीज पण सहभागी झाला आहे. अदानी समूहाची अंबुजा सिमेंटने, सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडचे सध्याचे प्रमोटर्स, रवी सांघी आणि त्यांच्या कुटुंबियांचा कंपनीतील 56.74 टक्के वाटा खरेदी केला.