Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका कॉलवर घर बसल्या मिळणार CNG, या शहरातून होणार सेवेचा श्रीगणेशा

या सुविधेसोबतच आता लोकांना सीएनजी भरण्यासाठी पंपावर जाऊन तासनतास पंपावर वाट पहावी लागणार नाही. तसेच लांबलचक रांगेतही थांबण्याची कटकट मिटून जाईल. कारचालकाला घरपोच सीएनजी मिळेल. सीएनजी डिस्पेंसिंग युनिट म्हणजेच मोबाईल सीएनजी स्टेशनला मंजूर देण्यात आली आहे.

एका कॉलवर घर बसल्या मिळणार CNG, या शहरातून होणार सेवेचा श्रीगणेशा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 11:39 AM

मुंबईः सीएनजी (CNG) कारचालकाचे दिल गार्डन गार्डन करणारी बातमी आहे. त्यांना व्हीआयपी सेवा लवकरच मिळणार आहे. 24 तास त्यांना घरपोच सीएनजी (CNG Home delivery) मिळणार आहे. तेही फक्त एका कॉलवर. त्यासाठी ना रांगेत उभं राहण्याची गरज आहे, ना सीएनजीवर वाट पाहण्याची आवश्यकता. फक्त एक कॉल त्यांना घरपोच सीएनजी मिळवून देईल. ग्राहकाच्या एका कॉलवर सीएनजी पंपचं त्यांच्या घरपोच येईल आणि त्यांच्या कारमध्ये सीएनजी भरेल. या गरजेच्या सुविधेचा श्रीगणेशा मुंबई शहरापासून सुरु होत आहे. यामुळे लोकांना आता सीएनजीसाठी लांबचलांब रांगांमध्ये उभं ठाकण्याची गरज नाही. तसेच त्यांना तासनंतास वाट पाहण्याची ही आवश्यकता नाही. सीएनजी डिस्पेंसिंग युनिट म्हणजेच मोबाईल सीएनजी स्टेशनला (Mobile CNG Station) मंजूर देण्यात आली आहे. परिणामी कारचालकाला घरपोच सीएनजी मिळेल.

24 तासात सीएनजी घरपोच

स्टार्टअप कंपनी Fuel Delivery यांनी मुंबईत सीएनजी होमी डिलिव्हरीसाठी महानगर गॅस लिमिटेड(Mahanagar CNG Station) सोबत सहकार्य करार केला आहे. या करारामुळे मोबाईल सीएनजी स्टेशन (Mobile CNG Station) तयार ठेवण्यात येतील. या मोबाईल स्टेशनच्या माध्यमातून आठवडयातील सातही दिवस आणि 24 तास गॅसची होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त कारचालकांपुरतीच मर्यादीत आहे, असे नाही. ही सुविधा ऑटो रिक्षा, कॅब, खासगी बस, व्यावसायिक वाहन, स्कूल बस यासर्वांसाठी उपलब्ध राहील. जी वाहनं सीएनजीवर चालतात. त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या दोन मोबाईल सीएनजी स्टेशन

स्टार्टअप कंपनी Fuel Delivery यांनी माहिती दिली आहे की, ही सुविधा सुरु झाल्यानंतर लोकांना सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब पंपावर तासनंतास वाट पाहण्याची काहीच आवश्यकता राहणार नाही. त्यांच्या जिकरीचे काम कंपनीने अगदी हलके केले आहे. लोक निवांत त्यांच्या घरुन एक कॉल करुन ही सेवा घरपोच मागवू शकता. त्यामुळे त्यांचा बहुमुल्य वेळ तर वाचेलच पण त्यांना होणारा मनस्तापही कमी होईल. सध्या या कंपनीला मुंबईत दोन मोबाईल सीएनजी डिस्पेंसिंग युनिट म्हणजेच मोबाईल सीएनजी स्टेशन सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. याचा श्रीगणेशा करण्याची तयारी जोरात सुरु आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईकरांना घरपोच सीएनजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात अगोदर मुंबईतील सायन आणि महापे येथील लोकांना ही सुविधा मिळणार आहे. यानंतर हळूहळू ही सुविधा संपूर्ण शहरात विस्तारेल आणि मुंबईकरांच्या चारचाकीत घरपोच सीएनजी भरण्याची सुविधा मिळेल.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.