सीएनजी महागला आता टॅक्सीचे भाडे वाढवा; मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी
महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. पेट्रोल (Petrol), डिझेल आणि सीएनजी अशा सर्वच इंधनाच्या (Fuel) दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्याने प्रवास देखील महागला आहे. आता याच पार्श्वभूमीवर मुंबई टॅक्सी मेन्स युनियनकडून कॅबच्या भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. पेट्रोल (Petrol), डिझेल आणि सीएनजी अशा सर्वच इंधनाच्या (Fuel) दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्याने प्रवास देखील महागला आहे. आता याच पार्श्वभूमीवर मुंबई टॅक्सी मेन्स युनियनकडून कॅबच्या भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुंबई लाईव्हने वृत्त दिले आहे. वाढत्या सीनएनजीचे दर पहाता टॅक्सी भाड्यामध्ये किमान 25 ते 30 रुपयांची वाढ करावी अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनकडून करण्यात आली आहे. टॅक्सीच्या दरांची तपासणी करण्यासाठी खटुआ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीमध्ये सीएनजीच्या दरात 25 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्यास कोणताही विलंब न करता टॅक्सिचे भाड वाढून सुधारीत भाडेवाढ लागू करावी अशी एक शिफारीश आहे. मात्र सीएनजीच्या दरात वाढ होऊन देखील अद्याप टॅक्सी भाडे वाढवण्यात न आल्याचे युनियनने म्हटले आहे.
युनियनची नेमकी मागणी काय?
गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीच्या दरात सात रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मात्र कॅबचे भाडे आजूनही वाढवण्यात आले नाही. जर सीएनजीच्या दरात 25 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्यास कोणताही विलंब न करता टॅक्सिचे भाड वाढून सुधारीत भाडेवाढ लागू करावी अशी तरतुद खटुआ समितीच्या अहवालामध्ये आहे. सीएनजीच्या किमतीमध्ये आता सात रुपयांपेक्षाअधिक वाढ झाल्याने कॅबचे दर वाढवावेत अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनकडूनकडून करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा शेवटची भाडेवाढ केली होती, तेव्हा पासून ते आतापर्यंत सीएनजीच्या दरात 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यचे युनियनच्या सदस्यांनी म्हटले आहे.
पेट्रोलचे भाव गगनाला भीडले
गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने दरवाढ सुरूच आहे. गेल्या पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक महागले आहे. इंधनाचे दर भरमसाठ वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने महागाईत वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच नाही तर काही दिवसांपूर्वी व्यवसायिक सिलिंडरची किंमत तब्बल 250 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. व्यवसायिक सिलिंडरचे भाव वाढल्याने हॉटेलमधील जेवन देखील महागले आहे.
संबंधित बातम्या
म्युच्युअल फंडची कोटीची उड्डाण, एसआयपीकडे वाढता कल; हजारो कोटींची उलाढाल
आत लवकरच डेबीट कार्डशिवाय ATM मधून काढता येणार पैसे, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा