CNG rate hike : मुंबईकरांना आणखी एक धक्का; सीएनजीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या नवे दर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएनजीच्या (CNG rate hike) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. जाणून घेऊयात नवे दर

CNG rate hike : मुंबईकरांना आणखी एक धक्का; सीएनजीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या नवे दर
सीएनजीचे दर वाढलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:04 AM

मुंबई: महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अन्नधान्यापासून ते खाद्यतेलापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते सीएनजी (CNG), पीएनजीपर्यंत (PNG) सर्वांच्याच किमती वाढल्या आहेत. आता मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. ते म्हणजे सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मुंबईला सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार प्रति किलो सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 80 रुपये एवढा झाला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेल स्थिर असताना दुसरीकडे मात्र वाढत असलेल्या सीएनजी, पीएनजीच्या किमतीने मुंबईकरांच्या चिंतेत भर घातली आहे.

सीएनजीच्या दरात वाढ सुरूच

सीएनजी, पीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. सीएनजीवरील व्हॅट कमी झाल्यानंतर सीएनजीचे दर देखील कमी झाले. मात्र हा आनंद ग्राहकांना फार काळ घेता आला नाही. त्याच्या अवघ्या चार दिवसांत  महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात वाढ केली. तेव्हापासून सातत्याने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी केल्याने 22 मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे एकीकडे ग्राहकांना दिसाला मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र सीएनजी, पीएनजीमध्ये सातत्याने वाढ सुरूच असल्यामुळे मुंबईकरांना त्याची मोठी आर्थिक झळ बसत आहे.

हे सुद्धा वाचा

पुन्हा भाड्यात वाढ होणार?

ओला, उबेरसारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी यापूर्वीच भाड्यात मोठी वाढ केली आहे. त्यामागे वाढत असलेल्या सीएनजी, पीएनजीच्या रेटचे कारण देण्यात आले आहे. आमचे सहकारी रिक्षाचालक जे आहेत, त्यांच्या मार्जीनमध्ये वाढत असलेल्या दरांमुळे घट झाल्याचे कारण सांगत कंपन्यांकडून भाडे वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी रिक्षाच्या बेसिक भाड्यामध्ये देखील वाढ झाली आहे. आता सीएनजी आणि पीएनजीचे दर असेच वाढत राहिल्यास पुन्हा भाडेवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.