नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक महागाईचे झटके लागतच आहेच. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात (CNG Price) वाढ करण्यात आली आहे. नॅचलर गॅसच्या दरांत सातत्यानं तेजी पाहायला मिळतेय. गेल्या दोन महिन्यात 12 वेळा सीएनजीचे दर वाढले आहेत. सीएनजीच्या दोन रुपयांची दरवाढ राजधानी दिल्लीत नोंदवण्याता आली. त्यामुळे आता दिल्लीत (Delhi CNG Rates) सीएनजीचा दर प्रतिकिलो 73.61 रुपये इतका झालाय. याआधी पेट्रोलची किंमत 71.61 रुपये इतकी होती. 7 मार्चपासून दिल्लीत सीएनजीच्या दरामध्ये 12 वेळा दरवाढ नोंदवण्यात आली आहे. यादरम्यान, कॉप्रेस्ड नॅचलर गॅसच्या किंमतीत 17.60 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. दरम्यान, आज पेट्रोल डिझेलचे दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Rates) दर गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त वेळेपासून स्थिर आहे. 6 एप्रिलपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. कच्च्या तेल्याचे दर वाढलेले असल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले होते. आता एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नसले, तरी सीएनजीच्या दरवाढीनं चिंता वाढवली आहे.
एकट्या एप्रिल महिन्यात 7.50 रुपयांची वाढ नोंदवण्यात आलेली आहे. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार मागच्या एका वर्षात सीएनजीचे दर तब्बल 30.21 रुपयांनी वाढले आहेत. म्हणजेच सीएनजीच्या दरांमध्ये तब्बल 60 टक्के दरवाढ नोंदवण्यात आलेली आहे.
The price of CNG in the national capital has been hiked by Rs 2 per kg, the 12th increase in rates in just over two months.
CNG in the national capital territory of Delhi now costs Rs 73.61 per kg, up from Rs 71.61 per kg— Press Trust of India (@PTI_News) May 16, 2022
29 एप्रिल रोजी पुण्यात सीएनजीच्या दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने आता सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत. तेव्हा सीएनजीचे दर 73 रुपयांवरून 75 रुपयांवर पोहोचले होते. तर त्यापूर्वी सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 68 रुपयांवरून थेट 73 रुपयांवर पोहोचले होते. दरम्यान, पुन्हा एकदा दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचलेत.
सीएनजीच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीच्या व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आल्याने सीएनजी गॅस प्रति किलोमागे सहा रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही.
त्यानंतर दोनच दिवसांमध्ये कंपन्यांकडून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. सीएनजीचे दर पाच रुपयांनी वाढवण्यात आले. त्यानंतर दोन रुपयांनी व आता पुन्हा एकदा दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा आर्थिक फटका ग्राहकांना बसताना दिसत आहे.