Inflation News : सर्वसामान्यांची चिंता मिटणार, सूसाट महागाईला लवकरच लगाम

Inflation : येत्या तीन महिन्यात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Inflation News : सर्वसामान्यांची चिंता मिटणार, सूसाट महागाईला लवकरच लगाम
महागाईचा तोरा कमी
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 8:14 PM

नवी दिल्ली : महागाईच्या (Inflation) आघाडीवर सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. येत्या तीन महिन्यात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रिसर्चमध्ये याविषयीची माहिती देण्यात आली. लेटेस्ट इकोरॅप रिपोर्ट नावाने हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) आधारित किरकोळ महागाई कमी होईल. आरबीआय महागाई दर 6 टक्क्यांपेक्षाही कमी होण्याचा अंदाज आहे. जानेवारी-मार्च 2023 मध्ये सरासरी किरकोळ महागाई दर 4.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाने याविषयीचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.72 टक्के होती. गुरुवारी याविषयीची ताजी आकडेवारी समोर आली. त्यात डिसेंबरपेक्षाही जानेवारी 2023 मध्ये महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. घसरणीचा हा प्रवास अजून काही महिने असाच राहू शकतो.

किरकोळ महागाई सातत्याने कमी होत आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाई 6.77 टक्के घसरली. नोव्हेंबर महिन्यांत महागाई दर 5.88 टक्क्यांपर्यंत आला. परंतु, भारतात किरकोळ महागाई दर तीन महिन्यात 6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आरबीआयच्या निश्चित दरापेक्षा तो जास्त आहे.

हे सुद्धा वाचा

एसबीआयचे समूह प्रमूख सल्लागार सौम्या कांति घोष यांनी महागाई कमी होण्याची कारणे स्पष्ट केली आहे. त्यानुसार, सीपीआय महागाई डिसेंबर 2022 मध्ये 12 महिन्यांच्या नीच्चांकी पातळीवर पोहचली आहे. हा दर 5.72 टक्क्यांवर आला आहे. हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

घोष यांच्या मते, भाजीपाल्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या. त्याचा मोठा फायदा महागाई दर कमी होण्यावर झाला. पीक पद्धतीत केलेला बदल उपयोगी ठरला. निसर्गाने यंदा चांगली साथ दिल्याने पीक उत्पादनात वाढ झाली. त्याचा परिणाम दिसून आला.

डिसेंबर महिन्यात ठोक महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा कमी नोंदविण्यात आला. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असला तरी दिलासादायक आहे. आकड्यानुसार, देशात ठोक महागाई दर 5.72 टक्के दिसून आला. तर नोव्हेंबर महिन्यात हा दर 5.88 टक्के होता. देशात रिटेल महागाई एक वर्षाच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे.

भाजीपाल्याच्या किंमती घसरल्याचा हा परिणाम आहे. येत्या काही दिवसात धान्य आणि डाळी बाजारात दाखल होतील.केंद्र सरकार डाळी आयात करणार असल्याचा फायदा होईल. तूरडाळ आणि हरबरा डाळीच्या किंमती नियंत्रणात राहतील. त्याचा फायदा येत्या तीन महिन्यात महागाईच्या आघाडीवर होईल.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.