महागाईचा कहर! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, FMCG वस्तूंच्या खरेदीत घसरण

देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे, सामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाला आहे. दैनंदीन गरजेच्या वस्तूचे (FMCG) भाव देखील गगनाला भिडले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट (Budget) कोलमडले आहे.

महागाईचा कहर! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, FMCG वस्तूंच्या खरेदीत घसरण
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 12:04 PM

देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे, सामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाला आहे. दैनंदीन गरजेच्या वस्तूचे (FMCG) भाव देखील गगनाला भिडले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट (Budget) कोलमडले आहे. नागरिकांनी केलेली बचत वस्तूंच्या खरेदीमध्ये खर्च होऊ लागली आहे. त्यामुळे संकट काळात थोडा तरी पैसा आपल्या हातात राहावा या विचाराने सध्या ग्राहक आपल्या गरजा कमी करताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणजे दररोज लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. देशातील अनेक राज्यात एफएमसीजी प्रोडक्ट उदाहरणार्थ तेल, साबन, निर्मा, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. याबाबत रिटेल इंटेलिजंस बिजोम या संस्थेकडून एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या अहवालामधून वाढत्या महागाईमुळे लोकांनी खरेदी कमी केले असल्याचे समोर आले आहे.

किरकोळ महागाई 6.95 टक्क्यांवर

महागाईमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी कशा प्रभावित झाल्या आहेत, हे सांगण्यासाठी रिटेल इंटेलिजंस बिजोम करून एक अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातून प्राप्त आकडेवारीनुसार दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या मागणीमध्ये 5.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक रोजच्या वस्तूंची देखील खरेदी टाळू लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई 6.07 टक्के होती, त्यामध्ये वाढ होऊन ती मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवर पोहोचली आहे. उत्तर, पूर्व आणि मध्य भारत वगळता जवळपास सर्वच राज्यांमध्ये या महागाईचा प्रभाव जाणू लागला आहे. दैनंदीन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीमध्ये घसरण झाली आहे. या अहवालानुसार दक्षीत भारतात परिस्थिती आणखी चिंताजनक असून, तेथील ग्राहकांच्या खरेदीमध्ये 18.3 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

ओडिशामध्ये FMCG विक्रीत तब्बल 32.4 टक्क्यांची घसरण

या अहवालानुसार किरकोळ महागाईत झालेल्या वाढीचा सर्वात मोठा फटका हा ओडिशा राज्याला बसला आहे. ओडिशामध्ये एफएमसीजी प्रोडक्टच्या मागणीमध्ये तब्बल 32.4 टक्यांची घट झाली आहे. ओडिशानंतर आंध्र प्रदेश, 28.5 टक्के तेलंगना 25.5 टक्के, झारखंडमध्ये 19.1 टक्के, कर्नाटकमध्ये 18.5 टक्के महाराष्ट्रात 9.3 टक्के आणि केरळ मध्ये 3.1 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका हा दक्षीण भारताला बसताना दिसत आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईत आणखीनच भर पडली आहे.

संबंधित बातम्या

LIC IPO या महिन्याच्या शेवटी गाठणार मुहूर्त; 12 मेपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता

पुण्यानंतर आता मुंबईकरांनाही CNG दरवाढीचा फटका; सीएनजीमध्ये पाच तर पीएनजीमध्ये साडेचार रुपयांची वाढ

आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; खतांवरील सबसीडी वाढणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.