उरकून घेतली का ही कामे? डेडलाईन आली जवळ, नाहीतर बसेल फटका
December Deadline | वर्षा अखेरीस काही महत्वाची कामे करणे आवश्यक आहे. डिसेंबर महिन्याच्या आत काही कामे केली नाही तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. म्युच्युअल फंडपासून बँक लॉकरपर्यंत ही कामे पूर्ण करावी लागणार आहे. ही कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे.
नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. या डिसेंबर 2023 मध्ये अनेक आवश्यक कामे करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. काही महत्वाची कामे याच महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर अडचणीत वाढ होऊ शकते. यामध्ये म्युच्यूअल फंडातील नॉमिनेशन करण्यापासून ते इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यापर्यंतच्या अनेक कामांचा समावेश आहे. बँक लॉकरपासून इतर ही अनेक कामे करावी लागतील. युपीआयप्रकरणात पण महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यासाठीची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे.
- म्युच्युअल फंड नॉमिनेशन – म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर , 31 डिसेंबर ही तारीख तुमच्यासाठी महत्वाची आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या खात्यात वारस जोडणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण केले नाही तर खाते गोठवले जाऊ शकते.
- अपडेटेट आयटीआर – आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 ही होती. ज्या करदात्यांनी या तारखेपर्यंत काम केले नाही, त्यांच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. या डेडलाईनपर्यंत विलंब शुल्कासह अपडेटेड आयटीआर दाखल करता येऊ शकते. दंडाची रक्कम आयकर विभागातील तरतूदीनुसार असेल. जर करदात्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यांना 5000 हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल. हे उत्पन्न कमी असेल तर एक हजारांचा दंड द्यावा लागेल.
- युपीआय खाते होऊ शकते बंद – युपीआय खात्यासंदर्भात नुकताच एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जर एक वर्षांपासून युपीआय एपचा वापर केला नसेल. त्यावरुन व्यवहार करण्यात आला नसेल तर तो युपीआय आयडी निष्क्रय करण्यात येईल. राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) गुगल पे, फोन पे, पेटीएम बाबत हा निर्णय घेतला आहे.
- लॉकर करार – एसबीआय, बँक ऑफ बडोदासह अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सुधारीत लॉकर एग्रीमेंटनुसार लॉकर करार करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. या महिन्याच्या अखेरीस 31 डिसेंबरपर्यंत ही अंतिम मुदत आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर बँक लॉकर सोडावे लागू शकते.
हे सुद्धा वाचा