Concord Biotech IPO : फार्मा कंपनीचा आयपीओ मैदानात, गुंतवणूकदारांच्या आताच उड्या

Concord Biotech IPO : या फार्मा कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. या कंपनीत राकेश झुनझुनावाला यांच्या फर्मने मोठी गुंतवणूक केली आहे. गुंतवणूकदारांची या आयपीओकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Concord Biotech IPO : फार्मा कंपनीचा आयपीओ मैदानात, गुंतवणूकदारांच्या आताच उड्या
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 3:19 PM

नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी जोरदार बातमी आहे. बायोटेक्नॉलॉजी फर्म कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ (Concord Biotech IPO) बाजारात दाखल झाला आहे. 4 ऑगस्ट म्हणजे आजपासून हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी उघडला गेला आहे. या आयपीओला 8 ऑगस्टपर्यंत सब्सक्राईब करता येईल. हा 1551 कोटी रुपयांचा आयपीओ आहे. आयपीओ बाजारात उतरविण्यापूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 464.95 कोटी रुपयांची रक्कम जमावली आहे. यामध्ये एकूण 41 अँकर गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवली आहे. आयपीओच्या शेअर्सचे वाटप 11 ऑगस्ट रोजी होईल. 18 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात हा स्टॉक सूचीबद्ध होईल. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या फर्मने या आयपीओत मोठी गुंतवणूक केली आहे.

ऑफर फॉर सेल इश्यू

कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. आयपीओचा प्राईस बँड 705 रुपये ते 741 रुपयांदरम्यान असेल. आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 शेअर्सचा लॉट खरेदी करावा लागेल. गुंतवणूकदाराला 14,820 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. सामान्य गुंतवणूकदारांना 13 लॉट खरेदी करावे लागतील. जास्तीत जास्त ते 2 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतील.

हे सुद्धा वाचा

झुनझुनवाला फर्मची गुंतवणूक

कॉनकॉर्ड बायोटेकमध्ये राकेश झुनझुनवाला यांच्या Rare एंटरप्राईजेजची मोठी गुंतवणूक आहे. झुनझुनवाला यांची एसेट मॅनजेमेंट कंपनी Rare एंटरप्राईजेजचा या फार्मा कंपनीत एकूण 24.09 टक्क्यांचा वाटा आहे. रेखा झुनझुनवाला आता सर्व कारभार सांभळतात. गुजरातमधील अहमदाबाद येथे कॉनकॉर्ड बायोटेकचे मोठे कार्यालय आणि फॅक्टरी आहे. येथूनच कंपनी जगभरातील 70 देशात उत्पादने पोहचवते.

इतक्या शेअरची विक्री

आयपीओचा प्राईस बँड 705 रुपये ते 741 रुपयांदरम्यान असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी सध्याच्या शेअरहोल्डर्सला 2,09,25,652 इतक्या शेअरची विक्री करेल. या फार्मा कंपनीच्या शेअरने सध्या बाजारात धुमाकूळ घातला आहे. स्टॉक ग्रे मार्केटमध्ये कमाल करत आहे. याचा GMP 150 रुपयांवर ट्रेड करत होता.

कंपनीची मोठी उलाढाल

गुजरातमधील अहमदाबाद येथे कॉनकॉर्ड बायोटेकचे मोठे कार्यालय आणि फॅक्टरी आहे. येथूनच कंपनी जगभरातील 70 देशात उत्पादने पोहचवते. यामध्ये अमेरिका, युरोप आणि जपान सारखे मोठ्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. या आयपीओचा ऑफर फॉर सेल साईज 1,551 कोटी रुपयांचा आहे.

लवकरच शेअर लिस्टेड

कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ 8 ऑगस्ट रोजी बंद होईल. 11 ऑगस्ट रोजी शेअर डीमॅट खात्यात क्रेडिट करण्यात येतील. 17 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालेल. 18 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात हा स्टॉक सूचीबद्ध होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीची या वर्षात जोरदार कामगिरी आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....