Gautam Singhania यांच्यावर पत्नी नवाज मोदींचा अजून एक आरोप; आता काय प्रकरण
Gautam Singhania- Nawaz Modi : रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांच्या आयुष्यातील कौटुंबिक विवादाची वादळं शमताना दिसत नाही. पूर्वी वडिलांशी वाद तर आता वर्षभरापासून पत्नीसोबतचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. या दोघांमध्ये पुन्हा एकदा नवीन वाद उफाळला आहे.
रेमंड समूहाचे (Raymond Group) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद उफाळला आहे. नवाज मोदी यांनी नवऱ्यावर आरोपांची राळ उडवली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कुटुंबातील घडामोडींची माहिती दिली. त्यांचे सासरे डॉ. विजयपत सिंघानिया यांनी नवाज यांच्या घटस्फोटाच्या मागणीला समर्थन दिले आहे. तर त्यांना एकूण संपत्ती त्यांना 50 टक्के वाटा हवा असल्याचे या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले.
फंडाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप
गुरुवारी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नवाज मोदी यांनी अनेक मुद्यांवर त्यांची मते मांडली. त्यांनी पतीवर आरोप केले. कंपनीच्या फंडाचा वापर गौतम सिंघानिया स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सासरे डॉ. विजयपत सिंघानिया यांना एकूण संपत्तीत 50 टक्के वाटा, तर त्यांना 25 टक्के वाटा हवा आहे. मुलगी निहारिका आणि निसा यांच्या नावे प्रत्येकी 25 टक्के वाटा हवा असल्याची मागणी त्यांनी रेटली.
गेल्या दिवाळीत वाद चव्हाट्यावर
या पती-पत्नीतील कौटुंबिक कलह गेल्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात समोर आला होता. तेव्हा या कार्यक्रमात नवाज मोदी यांना सहभाग होण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावरुन मोठा ड्रामा झाला. गौतम सिंघानिया यांनी ट्विटरवर (आताचे एक्स) एक भावनिक पोस्ट शेअर करत ही आयुष्यातील सर्वात वाईट दिवाळी असल्याचे जाहिर केले होते. तसेच पत्नीपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. त्यावेळी सिघांनिया यांची अंदाजित संपत्ती 1.4 अब्ज डॉलर असल्याचा दावा करत नवाज यांनी 75 टक्के वाटा मागितला होता. एका वृत्तानुसार, नवाज यांनी पतीच्या एकूण 11,660 कोटींच्या संपत्तीत 75% टक्के वाटा मागितला आहे. ही रक्कम 8745 कोटी रुपये होते. यामध्ये दोन मुली निहारिका आणि निसा आणि नवाज यांचा वाटा असेल.
घरगुती हिंसेचा केला आरोप
नवाज मोदी यांनी पती गौतम सिंघानिया यांच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप केला. पती मुलींना आणि आपल्याला मारझोड करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मुलगी निहारिकाला गौतम यांनी 15 मिनिटे मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता.