एक Bitcoin खरेदी करायचाय? मग मोजा 60 लाख! या तेजीचे हे पण एक कारण

Bitcoin Crypto Currency | बिटकॉईनने 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सध्या एका बिटकॉईनचा भाव 72800 dollars इतका आहे. डिसेंबर 2021 नंतर 63,725 डॉलरपेक्षा तो पुढे गेला. सध्या बिटकॉईनचे बाजारातील मूल्य हे 1.25 ट्रिलियन डॉलर आणि एकुण क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन 2.38 ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.

एक Bitcoin खरेदी करायचाय? मग मोजा 60 लाख! या तेजीचे हे पण एक कारण
बिटकॉईनच्या दामदार खेळीमागे हे पण एक कारणImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 9:29 AM

नवी दिल्ली | 13 March 2024 : वर्ष 2024 हे बिटकॉईनचे वर्ष मानण्यात येत आहे. आज Bitcoin चा भाव 72881 अमेरिकन डॉलर इतका रेकॉर्ड उच्चांकावर आहे. 5 मार्च रोजी रात्री बिटकॉईने 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. तर गेल्या आठवड्यात 9 मार्च रोजी बिटकॉईनने 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. बिटकॉईन ईटीएफ (Bitcoin ETF) हे या तेजीमागील खरे कारण आहे. अमेरिकेच्या बाजार नियंत्रकाने ईटीएफला मंजुरी दिली आहे. मेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने 11 स्पॉट बिटकॉईन ईटीएफला मंजुरी दिल्यानंतर तेजीचे सत्र सुरु झाले.

Bitcoin साठी मोजा 60 लाख

बिटकॉईन या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2024 रोजी किंमत 45 हजार डॉलर इतकी होती. आज बिटकॉईनची किंमत जवळपास 72 हजार 800 डॉलरच्या पार गेल्या आहेत. भारतीय चलनात ही किंमत 60,28,145 रुपये आहे. म्हणजे एक बिटकॉईन खरेदीसाठी 60 लाख रुपये मोजावे लागतील. डिसेंबर 2021 नंतर 63,725 डॉलरपेक्षा तो पुढे गेला. सध्या बिटकॉईनचे बाजारातील मूल्य हे 1.25 ट्रिलियन डॉलर आणि एकुण क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन 2.38 ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.

हे सुद्धा वाचा

दरवाढीचे हे पण एक कारण

  1. एप्रिल महिन्यात बिटकॉईनच्या उत्पादनात कपात करण्यात आली होती. त्यामुळे बिटकॉईन महागले. एक-दोन वर्षाच्या मंदीनंतर हालविंग इव्हेंटनंतर त्यात कपात होते. सध्या बिटकॉईनचे उत्पादन अर्ध्यावर आणण्यात आले आहे. परिणामी पुरवठा एका झटक्यात रोडवला. सध्या रोज जवळपास 900 नवीन बिटकॉईन तयार करण्यात येतात. तर हालविंग इव्हेंटनंतर ही संख्या दररोज 450 इतकी झाली आहे.
  2. बिटकॉईनच्या उत्पादनातील घट पण किंमतींच्या उसळीला कारणीभूत ठरली आहे. बिटकॉईन एका मर्यादीत संख्येतच आणल्या जात आहेत. एकूण 2 कोटी 10 लाख बिटकॉईनची निर्मिती होऊ शकते. त्यांच्या एकूण संख्येच्या 93 टक्के कॉईन बाजारात आणण्यात आले आहेत. सध्या जगभरात 19,649,381.25 बिटकॉईन अस्तित्वात आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे डिझाईन आणि हॉलविंगच्या कारणामुळे उर्वरीत 7% बिटकॉईनचे उत्पादन पुढील 100 हून अधिक वर्षांत करण्यात येऊ शकते.
  3. सातोशी नाकामोटो याने 2009 मध्ये बिटकॉईन या नावाने हे क्रिप्टो चलन तयार केले होते. तेव्हा या चलनाची किंमत अवघी 0.0008 डॉलर होती. म्हणजे केवळ 66 पैसे होते. विना सरकारी नियंत्रण असलेली भविष्यातील ऑनलाईन पेमेंट प्रणालीच्या रुपाने हे चलन बाजारात उतरविण्यात आले होते.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.