Credit Card : या 7 लोकांनी कधीच घेऊ नये क्रेडिट कार्ड, आयुष्यभर पश्चाताप कराल

| Updated on: Nov 28, 2024 | 6:01 PM

Credit Card Rule : आज आपण प्रत्येकाच्या पाकिटात क्रेडिट कार्ड असल्याचं पाहतो. काही लोकांकडे तर एक सोडून अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड असतात. पण तुम्हाला माहित आहे की, क्रेडिट कार्ड घेण्याचे जितके फायदे आहेत तितके त्याचे तोटे पण आहेत. खास करुन अशा काही लोकांसाठी जे काही नियम पाळत नाहीत. काय आहेत ते नियम जाणून घ्या.

Credit Card : या 7 लोकांनी कधीच घेऊ नये क्रेडिट कार्ड, आयुष्यभर पश्चाताप कराल
Follow us on

Credit card : आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर लोकं सहज करु लागले आहेत. आधी तरी लोकं क्रेडिट कार्ड घेताना खूप विचार करायचे. पण आता एकाच व्यक्तीकडे अनेक क्रेडिट कार्ड आढळतात. क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर दिल्या जातात. त्यामुळे लोकं त्याकडे आकर्षित होऊन खरेदी करतात. रिवॉर्ड पॉइंट देखील यावर आता दिले जाते. काही क्रेडिट कार्डमध्ये, तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्स रोखीत रुपांतरीत देखील करू शकता. पण असं असतानाही एक मोठा प्रश्न आहे की, प्रत्येकाने क्रेडिट कार्ड घ्यावे का? क्रेडिट कार्ड घेण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे नुकसान देखील आहेत. सर्वप्रथम तर क्रेडिट कार्डमध्ये अनेकांचा CIBIL स्कोर खराब होतो. त्यामुळे कोणी क्रेडिट कार्ड घेऊ नये ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. जे लोक त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत

एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास जमत नसेल तर त्याने क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार न केलेलाच बरा. कारण विचार न करता केलेला खर्च अडचणीत आणतो. क्रेडिट कार्ड घेतल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. ज्यामुळे मोठ्या व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागू शकते.

2. जे कर्ज वेळेवर भरत नाहीत

क्रेडिट कार्डची थकबाकी जर तुम्ही वेळेवर भरत नसाल तर तुम्हाला त्यावर अधिक व्याज आणि शुल्क लागू शकते. जर एखाद्याला तो वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणार की नाही याची खात्री नसेल तर त्याने ते न घेतलेलंच बरं.

3- जे लोकं खूप कर्जात आहेत

जर एखाद्या व्यक्तीवर आधीच खूप कर्ज असेल तर त्याने देखील क्रेडिट कार्ड घेणे टाळले पाहिजे. वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज अशी सगळी कर्ज असलेल्या लोकांनी क्रेडिट कार्ड घेऊन आणखी एक कर्ज वाढवण्याचा विचार करु नये. ज्याने आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

4- जे लोकं आपले बजेट बनवत नाहीत

जर एखादा व्यक्ती बजेट आणि खर्चाचे नियोजन करत नसेल. तर त्याने क्रेडिट कार्ड घेणे टाळले पाहिजे. कारण यामुळे कुऱ्हाड पायावर मारण्यासारखे आहे. क्रेडिट कार्ड घेऊन जे खर्च व्यवस्थापित करू शकत नाहीत ते थकबाकी भरण्यात चूक करतात.

5- ज्यांची कमाई कमी आहे

जर एखाद्याचे उत्पन्न कमी असेल तर त्याने क्रेडिट कार्ड घेणं टाळलं पाहिजे. क्रेडिट कार्ड वापरल्याने तो आणखी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतो.

6- जे लोक आर्थिक सुरक्षिततेबद्दल अनभिज्ञ आहेत

क्रेडिट कार्ड वापरताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. स्वाईप करण्या इतकं ते सोपं नसतं. यातून तुमची फसवणूक देखील होऊ शकते. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर त्याचा EMI पर्याय आणि व्याजदर समजून घेणे आवश्यक आहे. त्याबाबत जर योग्य माहिती नसेल तर अशा व्यक्तींनी क्रेडिट कार्ड घेणे टाळले पाहिजे.

7- जे आर्थिक शिस्त पाळत नाहीत

क्रेडिट कार्ड वापरताना त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक शिस्त आहे त्यांनी वापरले तर काही अडचण नाही. पण ते ते पाळत नाही त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड घेणे जोखमीचे ठरु शकते. लागते.