Crorepati Tips | दोन कप चहा करणार करोडपती! हा फॉर्म्युला वाचाच

Crorepati Formula | अनेक नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना चहा पिल्याशिवाय तरतरी येत नाही. त्यासाठी दिवसाकाठी कमीत कमी 20 रुपये खर्च ठरलेला आहे. पण या 20 रुपयांवरच करोडपती होता येते. ही जरा अतिशोयक्तीच वाटते नाही का? पण रोजच्या 20 रुपयांत तुम्हाला करोडपती होता येईल. असा आहे या फॉर्म्युलाचा दावा...

Crorepati Tips | दोन कप चहा करणार करोडपती! हा फॉर्म्युला वाचाच
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 11:41 AM

नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला खूप पैसा हवा असतो, त्यामुळे तो त्याची स्वप्नं पूर्ण करु शकतो. अर्थात प्रत्येकाला लॉटरी लागू शकत नाही. पण बचतीच्या सवयीमुळे तुम्ही पण करोडपती होऊ शकतो. निदान लखपती तर होऊच शकता. त्यासाठी फार मोठी बचत करण्याची गरज नाही. दिवसभरातील दोन कप चहाच्या खर्चात तुम्हाला कोट्याधीश होता येईल. 20 रुपये तुमचे नशीब पालटवू शकते. जास्त चहा तसाही आरोग्यासाठी हानीकारक आहे. चहा सोडून एक प्रकारे तुमचे डिटॉक्स होईल आणि बचतीतून मोठी कमाई साधता येईल.

श्रीमंत व्हा 20 रुपयांत

चहा हा अनेकांना प्रिय आहे. काही जण तर दिवसाला अनेक कप चहा रिचवतात. काहींना चहा सोडवत नाही. 20 रुपयांचा चहा तुमचं नशीब पालटवू शकतो, हे तुमच्या कधी गावी आलं नसेल. पण या फॉर्म्युल्याच्या दाव्यानुसार, दृढ निश्चय केला आणि नियमीत बचत केली तर करोडपती होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला वाटतं असेल असा कोणता फॉर्म्युला आहे, जो 20 रुपयांत श्रीमंत करेल?

हे सुद्धा वाचा

Mutual Fund येईल कामी

म्युच्युअल फंड (Mutual Fund) विषयी तुम्हाला माहितीच असेल. त्यातील पद्धतशीर गुंतवणूक योजना, SIP हा शब्द पण तुमच्या कानावरुन गेला असेल. तर हा फॉर्म्युला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर आधारीत आहे. दोन कप चहाचे पैसे एसआयपीत गुंतवले तर तुम्हाला मोठा फायदा होईल. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला मालामाल होता येईल.

दिवसाकाठी करा बचत

दिवसाकाठी 20 रुपयांची बचत तुम्हाला श्रीमंत करु शकते. एका महिन्याला म्युच्युअल फंडात तुम्हाला 600 रुपये जमा करता येतील. म्युच्युअल फंड ॲपच्या मदतीने तुम्हाला सहज गुंतवणूक करता येते. पण गुंतवणूक तज्ज्ञाच्या सल्ल्याने योग्य फंडात गुंतवणूक करा. आता तर आठवड्याची, महिना, तिमाही, सहामाही आणि वार्षिक एसआयपीची सोय झाली आहे. त्याचा फायदा घेता येईल.

असे व्हाल करोडपती

20 वर्षाच्या तरुणाने महिन्याकाठी 600 रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले तर त्याला फायदा होईल. 40 वर्षांपर्यंत वा 480 महिने त्याने ही गुंतवणूक केली तर तो 2,88,000 रुपये गुंतवणूक करेल. त्यावर 15 टक्के रिटर्न गृहीत धरला तर परताव्याची रक्कम 1,88,42,253 रुपये होईल. 20 टक्के परतावा गृहीत धरला तर ही रक्कम 10,18,16,777 रुपये इतकी होईल. साधारणपणे 12 टक्के परतावा मिळाल्यास तुम्ही लखपती व्हाल. बचत नियमीत केल्यास, योग्य फंड निवडल्यास पुढील 20 -25 वर्षांत करोडपती अथवा लखपती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ही कम्पाऊंडिंगची जादू आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.