Marathi News Business Crude oil bounces in the international market, the price is around 80 dollars, before filling the tank, know the price of petrol and diesel in your city
Petrol Diesel Price Today : 80 डॉलरपर्यंत पोहचले कच्चे तेल, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल महागले तर नाही ना
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचे भाव 80 डॉलरपर्यंत पोहचले आहेत. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल महागले काय, काय आहे आजचा भाव
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचे भाव 80 डॉलरच्या घरात गेले आहे. या नव्या वर्षात कच्चा तेलाच्या (Crude Oil Price) आघाडीवर मोठा दिलासा होता. दोन अडीच महिन्यांपासून कच्चा तेलाचे भाव सातत्याने घसरत होते. युक्रेन युद्धापासून भारताने रशियाकडून इंधनाची आयात वाढवली आहे. इतर कच्चा तेलापेक्षा भारताला रशियाकडून 2 डॉलर प्रति बॅरल स्वस्तात इंधन मिळत आहे. रशियाने जागतिक बाजारात दबाव झुगारण्यासाठी जूनपर्यंत उत्पादन घटवले आहे. तर तुर्कीने एका प्लँटमधून उत्पादन कमी केले आहे. अमेरिका आणि युरोपातील घडामोडींचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर दिसून येत आहे. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) महागले काय, काय आहे आजचा भाव
भारतात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 1.75 टक्के वधारले. आज या इंधनाची किंमत 75.67 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 1.64 टक्क्यांनी वाढून 79.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
हे सुद्धा वाचा
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 106.77 पेट्रोल आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 107.50 आणि डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.09 आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
भाव एका SMS वर
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.