crude oil Imports : कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ, भविष्यात इंधनाचे दर स्थिर राहणार?
एकीकडे रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामुळे कच्च्या तेलाचे (Crude oil) दर गगनाला भिडले आहेत. मात्र दुसरीकडे भारतात कच्च्या तेलाच्या आयातीत मोठ्या प्रामाणात वाढ झाल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे.
एकीकडे रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामुळे कच्च्या तेलाचे (Crude oil) दर गगनाला भिडले आहेत. मात्र दुसरीकडे भारतात कच्च्या तेलाच्या आयातीत मोठ्या प्रामाणात वाढ झाल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे. भारतामध्ये कच्च्या तेलाची आयात वाढून दिवसाला 4.86 मिलियन डॉलर बॅरलवर पोहोचली आहे. 2020 नंतर प्रथमच भारतात यवढ्या मोठ्याप्रमाणात कच्चे तेल आयात होत आहे. आकडेवारीनुसार डिसेंबर 2021 च्या तुलनेमध्ये जानेवारी 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या आयातीत पाच टक्क्यांची वाढ झाली होती. तर फेब्रुवारी 2022 मध्ये कच्च्या तेलाची आयात तब्बल 24 टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय रिफायनर सामान्यपणे प्रोसेसिंगच्या एक महिना आधीच कच्च्या तेलाची खरेदी करतात. डिसेंबर 2021 नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने कमी होत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आयात, निर्यातीवर होताना दिसत असून, परिणामी चालू वर्षात कच्च्या तेलाची आयात देखील वाढली आहे. भारत हा जगातील तीसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे.
मध्य पूर्व देशांवरील अवलंबित्व कमी झाले
भारत आपल्या आवश्यकतेपैकी तब्बल 85 टक्क्यांपेक्षा अधिक कच्च्या तेलाची आयात करतो. सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात मध्य पूर्व देशांकडून केली जाते. मात्र आता हळूहळू मध्य पूर्व देशांवरील अवलंबित्व कमी होत आहे. कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या कंपन्या जास्त मार्जिनच्या आशेने कच्चे तेल आयात करण्याच्या इतर पर्यायांचा शोध घेत आहेत. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात बंद केली आहे. आता या कच्च्या तेलाची आयात भारत करू शकतो. त्यामुळे भारताला आणखी स्वस्त तेल मिळण्याची शक्यता आहे.
कॅनडा, अमेरिकेमधून होणाऱ्या आयातीचे प्रमाण वाढले
भारत सामान्यपणे मध्य पूर्वेकडील देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो. मात्र प्रथमच चालू वर्षात कॅनडा आणि अमेरिकेमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण वाढले आहे. कॅनडा आणि अमेरिकेमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण 14 टक्क्यांवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाला पुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू झाल्याने पुढील काळात इंधनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Sugar export : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखरेला मोठी मागणी; निर्यात दुपटीने वाढली
‘Interest only’ होमलोनचं चक्रव्यूह; बँकांच्या ऑफरमागील सत्य समजून घ्या
अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील