Petrol Diesel Price Today : कच्चे तेल घेत आहे फिरकी, पेट्रोल-डिझेलच्या भावात सातत्याने आलटी-पलटी
Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात अमेरिकेने व्याजदर वाढविल्याने डॉलरचा मोठा दबाव तयार झाला आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय
नवी दिल्ली : जागतिक बाजारात डॉलरचा दबाव वाढत आहे. अमेरिकेन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे उलथापालथ सुरु आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यामुळे सोने-चांदी, इंधनावर परिणाम दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता इंधनाचे भाव जाहीर केले. शुक्रवारी कच्चा तेलाचे दर किंचित वाढले. काल भाव गडगडले होते. आज 5 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 68.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 72.61 डॉलरहून प्रति बॅरलवर आले आहे. आज सर्वच शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) मोठा बदल दिसला नाही. तुमच्या शहरातील इंधनाचा दर किती आहे, जाणून घेऊयात.
इंधन होईल स्वस्त सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.
जून महिन्यात पहिली कपात मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक आहे. त्यानंतर 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
भाव एका SMS वर
- भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
- देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
- त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
- पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
- इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
- इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
- बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
- त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
- त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
- एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
- मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
- अहमदनगर पेट्रोल 106.68 तर डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
- अमरावतीत पेट्रोल 107.15 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद 106.52 पेट्रोल आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
- जळगावमध्ये पेट्रोल 107.33 आणि डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.06 आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27रुपये प्रति लिटर
- परभणी पेट्रोल 108.76 तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोलचा भाव 106.14 आणि डिझेल 92.66 रुपये प्रति लिटर
- सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.52 रुपये तर डिझेल 93.04 रुपये प्रति लिटर
- ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर