कच्च्या तेलाची रॉकेट भरारी, 14 वर्षांत पहिल्यांदा किंमती 130 डॉलरवर तर सोन्यालाही दरवाढीची झळाळी

रशिया-युक्रेन युद्धाने आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचा सदृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. ईराणकडून होणारा तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिका, युरोप आणि मित्रराष्ट्रांनी रुसकडून तेल खरेदीला प्रतिबंध घातल्याने कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीच्या वाढल्या आहेत.

कच्च्या तेलाची रॉकेट भरारी, 14 वर्षांत पहिल्यांदा किंमती 130 डॉलरवर तर सोन्यालाही दरवाढीची झळाळी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 10:33 AM

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाने (Russia-Ukraine Crisis) आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचा सदृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. ईराणकडून होणारा तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिका, युरोप आणि मित्रराष्ट्रांनी रुसकडून तेल खरेदीला प्रतिबंध घातल्याने कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil Price) आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीच्या वाढल्या आहेत. गेल्या 14 वर्षांतील या सर्वोच्च किंमती आहेत. 2008 मध्ये किंमती 130 डॉलरवर पोहचल्या होत्या. त्यानंतर आता किंमती गगनाला भिडल्या आहेत. एकतर कोरोना संकट मंदावले आहे, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याचा परिणाम मागणीवर झाला. अनेक देशात इंधनाची मागणी वाढली तर जागतिक संकटामुळे आणि निर्बधांमुळे तेलाचा पुरवठा कमी झाल्याने किंमती भडकल्या आहेत. तर दुसरीकडे सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. सोन्याच्या किंमतींनी (Gold Prices) आतंरराष्ट्रीय बाजारात 2000 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

इराण सोबतची चर्चा विफल अणुप्रकल्पाविषयी ईराणने 2015 मध्ये एक करार केला होता. यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य देश ज्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन आणि फ्रान्स यांचासह जर्मनीचा समावेश होता. या करारामुळे इराणवरील अनेक निर्बंध हटवण्यात आले होते. 2018 मध्ये अमेरिकेचे राष्ट्पती डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर प्रतिबंध घातले होते. तेव्हापासून ईराणची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दरम्यान सध्याचे राष्ट्रपती जो बाईडन यांनी इराणवरील प्रतिबंध हटवण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे चर्चा सुरु आहे. पण अमेरिकेसह ज्या सहा राष्ट्रांनी प्रतिबंध लादले आहेत, त्या सर्वांनी प्रतिबंध हटवले तरच चर्चेला येऊ असा निरोप इराणने पाठविला आहे. दुसरीकडे रशिया आणि चीन यांनी इराणसोबत चर्चेसाठी त्यांच्या अटी समोर केल्या आहेत. त्यामुळे चर्चेचे गाडे पुढे गेले नाही. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी अमेरिका आणि मित्रराष्ट्र रशिया सोबत तेल आणि नैसर्गिक गॅसच्या आयातीवरील प्रतिबंध हटविण्यासाठी चर्चा करत असल्याचे सांगितले.

सोने 2000 डॉलरच्या वर इंधन दरवाढीचा वर्तमानकाळ अनुभवत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याने ही भाव खाला आहे. सोने आणि चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याने आज 2000 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या किंमती 19 महिन्यांच्या उच्चतम पातळीवर आहेत. सोने-चांदीच्या किंमती ऑगस्ट 2020 मध्ये सर्वोच्च पातळीवर होत्या. सध्या चांदी 26 डॉलरच्या पुढे गेली आहे. सोन्या-चांदीतील दरवाढ कायम राहिली तर भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

EPFO योजना : खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ, महिना 15-30 हजार पेन्शन

Family Pension : ‘यांनाही’ मिळणार फॅमेली पेन्शनचा फायदा, केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय

6 कोटी पीएफ खातेधारकांचा ताण मिटला; पुन्हा काढता येणार कोविड ॲडव्हान्स रक्कम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.