Petrol Diesel Rate Today : फिरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव, इतके झाले स्वस्त

Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाने भारतात स्वस्ताईचे संकेत दिले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भावातील घसरण कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. केंद्र, राज्य सरकारसह कंपन्या कमाईवर गब्बर झाल्या आहेत. नागरिकांना त्याचा कधी फायदा मिळणार आहे..

Petrol Diesel Rate Today : फिरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव, इतके झाले स्वस्त
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 8:37 AM

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल स्वस्ताईच चर्चा तर रंगली आहे. पण कंपन्या, केंद्र आणि राज्य सरकार मलाई सोडायला तयार नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नागरिकांना चढ्या दरानेच इंधन खरेदी करावे लागत आहे. कंपन्यांना केंद्र सरकारने रिलफ पॅकेज दिले होते. त्यांचा तोटा भरुन काढला होता. कच्चा तेलाने (Crude Oil Price) उसळी न घेतल्याने कंपन्यांचा फायदा झाला आहे. कंपन्या रशियाकडून स्वस्त दरात इंधन खरेदी करुन युरोपमध्ये विक्री करत आहे. त्यातून त्यांना कमाई सुरु आहे. म्हणजे केंद्र, राज्य सरकार आणि तेल कंपन्यांचे पाच ही बोटं सध्या तुपात आहे. पण प्रश्न आहे, नागरिकांना त्याचा फायदा कधी देणार? राज्यात पेट्रोल-डिझेलचा (Petrol Diesel Price) आजचा हा आहे भाव..

किंमतीत मोठी घसरण मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती सर्वाधिक प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून किंमती घसरणीवरच आहेत. त्यानंतर कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. सातत्याने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत.

आज हा भाव जागतिक बाजारात कच्चे तेल घसरणीवरच आहे. 25 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 73.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 69.16 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 107.17 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.07 पेट्रोल आणि डिझेल 93.55 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.86 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल

विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.