नवी दिल्ली : एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना, दुसरीकडे आज सलग 18 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel rate today) जाहीर करण्यात आले. नव्या दरानुसार इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. एकीकडे आंतराराष्ट्रीय बाजारत कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil price) वाढत आहेत. कच्चे तेल 106 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. मात्र दुसरीकडे भारतात इंधनाच्या किमती गेल्या आठरा दिवसांपासून स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 तर डिझेल 99.83 रुपये लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 110.85 आणि 100.94 रुपये लिटर आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार राज्यात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राज्याची राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.40 आणि 103.10 रुपये प्रति लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 121.13 तर डिझेल 103.79 रुपये लिटर आहे. देशाची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 120.40 तर डिझेल 103.73 रुपये लिटर आहे. परभणीमध्ये सध्या सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत असून, शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 तर डिझेलचा दर प्रति लिटर 106.10 रुपये लिटर आहे. पुण्यात प्रति लिटर पेट्रोलचा दर 120.20 असून डिझेलचा भाव प्रति लिटर 103.10 इतका आहे.
राज्यात गेल्या सहा एप्रिलपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शेवटची दरवाढ ही सहा एप्रिल राजी करण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात इंधनाची भाववाढ सुरू होती. या काळात पेट्रोल, डिझेल प्रति लिटर दहा रुपयांपेक्षाही अधिक महागले. मात्र त्यानंतर दरवाढीला लगाम मिळाल्याचे पहायला मिळत आहे.
LIC IPO : पुढील आठवडा अत्यंत महत्वाचा! आयपीओचा आकार घटणार; घोषणेकडं लक्ष