Crude Oil Prices | आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव झरझर आले खाली, आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर होतील का कमी?

Crude Oil Prices | आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमालीचे घसरले आहेत, तुमच्या शहरातील भाव गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहेत, आता त्यात बदल होऊ शकतो?

Crude Oil Prices | आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव झरझर आले खाली, आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर होतील का कमी?
पेट्रोल डिझेल होईल का स्वस्त?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 3:36 PM

Crude Oil Prices | आंतरराष्ट्रीय बाजारात(International Market) कच्च्यात तेलाच्या (Crude Oil Prices) किंमती कमालीच्या घसरल्या आहेत. जागतिक आर्थिक मंदीच्या धसक्याने तेलाच्या किंमतींवर परिणाम दिसून आला. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine Crises) यांच्यात लांबलेल्या युद्धाचे परिणाम ही दिसून येत असल्याने, अमेरिका चीन यांच्यातील नवीन विसंवादामुळे जागतिक भूराजकीय घडामोडी झपाट्याने मंदीवर परिणाम करत आहेत. जागतिक आर्थिक मंदीच्या (Economic Recession) भीतीपोटी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची घसरण होत आहे. मंदीच्या भीतीपोटी कच्च्या तेलाच्या मागणीत घट आली आहे. सोमवारी कच्च्या तेलाचा भाव अनेक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर (Lowest Level) आला. सध्या देशातंर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) गेल्या दोन महिन्यांत फारशा काही बदल्या नाहीत. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलातील दरात घसर झाल्याने त्याचा फायदा तुम्हाला होईल का? ते पाहुयात.

कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घसरण

रॉयटर्सच्या (Reuters) वृत्तानुसार, ब्रेंट क्रूडचा (Brent Crude Price) भविष्यातील खरेदीदर 0.80 टक्क्यांनी घसरून 94.18 डॉलर प्रति बॅरलवर आला. फेब्रुवारी 2022 नंतर कच्च्या तेलाची ही नीचांकी पातळी आहे. गेल्याच आठवड्यात कच्चे तेल 13.7 टक्क्यांनी स्वस्त झाले. त्याचप्रमाणे वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड सीएलसी(CLC) आज 67 सेंट्स कमी होऊन 88.34 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. गेल्या आठवडाभरात याच्या किंमतीत 9.7 टक्क्यांची घसरण झाली.

हे सुद्धा वाचा

जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार चीन आहे. चीनने जुलै महिन्यात दररोज 8.79 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले. जूनमधील चार महिन्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा हे प्रमाण चांगले असेल, पण वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ते 9.5 टक्क्यांनी कमी आहे. चिनी रिफायनर कमी मार्जिनमुळे आयाती करण्याऐवजी त्यांच्याकडील इंधन साठा वापरत आहेत, ज्याचा परिणाम मागणीवर होत आहे. चीन सध्या कोविड हाताळण्यात व्यस्त आहे, त्याचाही मागणीवर विपरीत परिणाम दिसून येत आहे.

जागतिक बाजारपेठेतील मागणी अजूनही कमी

ANZ ने 2022 आणि 2023 या वर्षांतील तेलाच्या मागणीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. आता एएनझेडला 2022 मध्ये दररोज 3 लाख बॅरल आणि 2023 मध्ये दररोज 5 लाख बॅरलची मागणी अपेक्षित आहे. 2022 मध्ये तेलाची मागणी अंशत: सुधारेल अशी अपेक्षा आहे,पण तरीही कोविडपूर्व काळापेक्षा ही मागणी कमीच राहणार आहे. तर दुसरीकडे निर्बंध लादलेले असताना रशियाला त्याचा फायदा मिळत आहे. त्याच्याकडे तेलाची मागणी नोंदवली जात आहे.

2 महिन्यांपासून डिझेल, पेट्रोलचे दर बदलले नाहीत

सध्या देशातंर्गत जवळपास 2 महिन्यांपासून डिझेल-पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आता पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आहे. त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोलचे दर 106.35 रुपये, कोलकातामध्ये 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहेत. डिझेलचे दर दिल्लीत 89.62रुपये, मुंबईत 94.28 रुपये, कोलकातामध्ये 92.76 रुपये आणि चेन्नईत 94.24 रुपयांवर स्थिर आहे. या दोन महिन्यांच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारात डिझेल-पेट्रोलचे दर सुधारता येतील, अशी अपेक्षा वाढली आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.