Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार, तुमच्या खिशावरील कमी होईल का भार

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार सुरु आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक वस्तूंचे दाम वाढले आहे. क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्याने तुमच्या खिशावरील दरवाढीचा भार कमी होईल का?

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार, तुमच्या खिशावरील कमी होईल का भार
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली : भारतात प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलचा भाव अद्ययावत करण्यात येतात. सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींनुसार बदलतात. क्रूड ऑईलच्या किंमतींचा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर (Petrol Diesel Price) परिणाम होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 मार्च, 2023 रोजी क्रूड ऑईलच्या (Crude Oil Price) किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक वस्तूंचे दाम वाढले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. सध्या पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचा मुद्दा गरम आहे. क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्याने तुमच्या खिशावरील दरवाढीचा भार कमी होईल का?

आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 0.62 टक्क्यांची घसरण होऊन किंमत 76.57 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. तर 1.75 टक्क्यांची वाढ होऊन 83.89 डॉलर प्रति बॅरलवर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 108.04 तर डिझेल 94.51 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर आहे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.