Petrol Diesel Price Today : या शहरात स्वस्त इंधन, तर येथे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Price Today : देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर केला. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या.
नवी दिल्ली : जागतिक बाजारात, अमेरिका आणि डॉलर खेळ करत आहे. डॉलरच्या दबावामुळे सर्वच वस्तू्ंच्या किंमतीत चढउतार होत आहे. फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा हा परिणाम आहे. सोने-चांदीसह इंधनाच्या किंमतीत त्यामुळे उलथापालथ सुरु आहे. आज 6 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 4.05 टक्क्यांनी वधारले. हा भाव 71.34 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 3.86 टक्क्यांनी वाढला. भाव 75.30 डॉलर प्रति बॅरल झाले. देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) जाहीर केला. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या.
मोठा बदल नाही केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 350 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
- सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
- तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
- संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
- 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
- वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
- मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
- अहमदनगर पेट्रोल 106.25 तर डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
- अमरावतीत पेट्रोल 107.61 तर डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर
- जळगावमध्ये पेट्रोल 106.33 आणि डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.49 तर डिझेल 93.98 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.70 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 93.59 रुपये प्रति लिटर
- परभणी पेट्रोल 109.41 तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोलचा भाव 106.72 आणि डिझेल 93.21 रुपये प्रति लिटर
- सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.86 रुपये तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर
- ठाणे पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर