Petrol Diesel Price Today : आनंदवार्ता, कच्चा तेलाची घसरगुंडी! पेट्रोल-डिझेलची आली का स्वस्ताई

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाची घसरगुंडी उडाली आहे. भाव सातत्याने खाली जात आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या फायद्यात आहेत. तुमच्या शहरात आली का पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई?

Petrol Diesel Price Today : आनंदवार्ता, कच्चा तेलाची घसरगुंडी! पेट्रोल-डिझेलची आली का स्वस्ताई
आज भाव झाला का कमी
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने लोळण घेतले आहे. भावात जोरदार घसरण झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्या फायद्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाने जोरदार उसळी घेतली होती. क्रूड ऑईल (Crude Oil) थेट 90 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचले होते. ओपेक प्लस देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केली असली तरी त्याचा फारसा परिणाम बाजारावर दिसून आलेला नाही. देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) जाहीर केला. आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. देशात आता इतर राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचा बिगूल वाजेल. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती 20 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

कशाचा झाला परिणाम अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. डॉलरचा दबाव दिसून येत आहे. तर त्याचवेळी अमेरिकेसह युरोपात जागतिक मंदीचे वारे वाहत आहे. मंदीचा फेरा कधी येईल हे निश्चित नसले तरी त्याची भीती मात्र कायम आहे. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सच्या बातमीनुसार, कच्चा तेलाने मंदीच्या भीतीने 2 टक्क्यांची उसळी घेतली होती.

कच्चा तेलात घसरण आज 10 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 0.27 टक्क्यांनी घसरुन हा भाव 73.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 0.26 टक्क्यांनी कमी झाले. भाव 77.24 डॉलर प्रति बॅरल झाले.

हे सुद्धा वाचा

एक लिटरवर कराचे गणित एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.53 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.50 आणि डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.09 आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.93 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
  15. ठाणे पेट्रोलचा दर 106.01 रुपये तर डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...