गगनभेदी भरारी घेतल्यानंतर क्रिप्टोकरन्सी धराशायी; 24 तासांत इतक्या लाखांनी स्वस्त झाले बिटकॉईन
Crypto Currency Bitcoin Collapsed : क्रिप्टो जगतातील आनंदावर अवघ्या 24 तासातच विरजण पडले. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन तोंडावर आपटले. कालच बिटकॉईनने सर्वात उच्चांकी भरारी घेतली होती. आता या क्रिप्टोत 11 टक्क्यांहून अधिकची घसरण आली आहे. बिटकॉईन इतके आपटले.
क्रिप्टो करन्सी बाजारात काल आनंदाचे उधाण होते. गुंतवणूकदारांचा भांगडा सुरू होता. पण अवघ्या 24 तासातच मोठा उलटफेर झाला. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन तोंडावर आपटले. एकाच दिवसात बिटकॉईन 11 टक्क्यांनी घसरले. गेल्या 24 तासात बिटकॉईनमध्ये 11,900 डॉलरहून अधिकची म्हणजे 10 लाख रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांवर बिटकॉईनच्या किंमतीत 5 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. जल्लोष साजरा करणाऱ्या गुंतवणूकदारांना हा मोठा झटका बसला आहे.
बिटकॉईनची तडाखेबंद कामगिरी
काल Bitcoin ने तडाखेबंद कामगिरी केली होती. गुरुवारी बिटकॉईनचा भाव 7 टक्क्यांच्या तेजीसह 102,656.65 डॉलरवर पोहचला होता. तर त्यानंतर बिटकॉईनची किंमत 103,900.47 डॉलरवर पोहचली होती. बिटकॉईनच्या किंमतीत मोठी तेजी दिसली आहे. बिटकॉईनचा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात बिटकॉईनचा भाव 94,660.52 डॉलरसह निच्चांकावर पण पोहचला होता. बिटकॉईनचा भाव लवकरच 1.25 लाख डॉलरवर पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
10 लाखांनी बिटकॉईन स्वस्त
कॉईन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, बुधवारी बिटकॉईनच्या किंमती 1,03,900.47 डॉलरसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या होत्या. पण बाजाराने घुमजाव केले. अवघ्या 24 तासात जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईनमध्ये आपटी बार आला. बिटकॉईन किंमत 11 टक्क्यांहून अधिकने घसरल्या. बिटकॉईनमध्ये 11,901.69 डॉलरची घसरण आली. भारतीय चलनात बिटकॉईन 10,08,021.53 रुपयांनी घसरला. गुंतवणूकदारांना हा मोठा झटका मानण्यात येत आहे.
आता किती आहे बिटकॉईनचा भाव
कॉईन मार्केटच्या डाटानुसार, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्स, बिटकॉईन किंमतीत 5.69 टक्क्ये घसरणीसह 97,476.17 डॉलर प्रति औसवर व्यापार करत आहेत. कालच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा या किंमती 6.26 टक्के म्हणजे 6,424.3 डॉलरने कमी आहेत. बिटकॉईन एक लाख डॉलरच्या पुढे गेल्याने गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला होता. पण नंतर 24 तासातच बिटकॉईनचा भाव कमी झाला.
असा करून दिला फायदा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकालानंतर बिटकॉईनच्या भावात 50 टक्क्यांहून अधिकची उसळी आली आहे. गेल्या एका आठवड्यापासून बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 145 टक्क्यांहून अधिकची कमाई करुन दिली आहे. या वर्षाअखेर हा आकडा वाढण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे.