Cryptocurrency price : आज बिटकॉइनच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रमुख क्रिप्टो करन्सीचे दर

आज बिटकॉइनच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवारी अचानक आलेल्या तेजीनंतर आज बिटकॉइनचे दर अचानक कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Cryptocurrency price : आज बिटकॉइनच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रमुख क्रिप्टो करन्सीचे दर
CryptocurrencyImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 2:07 PM

नवी दिल्ली : एक दिवसापूर्वी शुक्रवारी बिटकॉइनमध्ये (Bitcoin) तेजी दिसून येत होती. बिटकॉइन 1530.09 डॉलर म्हणजेच 5.33 टक्क्यांच्या तेजीसह 30204.92 डॉलर (Dollars) प्रति बिटकॉइनवर पोहोचला. मात्र आज शनिवारी बिटकॉइनच्या मूल्यामध्ये घसरण झाली आहे. बिटकॉईन 30,000 डॉलरच्या खाली घसरला आहे. आज मार्केट (Market) सुरू होताच बिटकॉईनच्या दरात तीन टक्क्यांची घसरण झाली. आज सकाळपासूनच बिटकॉइनच्या दरात घसरणीला सुरुवात झाली आहे. चालू वर्षात आतापर्यंत बिटकॉइनच्या दरात तब्बल 36 टक्क्यांपेक्षाही अधिक घसरण झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉइनची किंमत 69000 डॉलर प्रति बिटकॉइन इतकी होती. त्यामध्ये घसरण होऊन आता बिटकॉइनचा दर 30,000 डॉलरच्या खाली घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिटकॉइनच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

क्रिप्टोमधील गुंतवणूक वाढली

सध्या प्रमुख क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये घसरण सुरू आहे. मात्र तरी देखील दुसरीकडे गुंतवणूकदार क्रिप्टोमधील गुंतवणूकीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात क्रिप्टोमधील गुंतवणूक ही तब्बल 27.4 कोटी डॉलरने वाढली आहे. यावरून तुम्हाला क्रिप्टोमधे वाढत असलेल्या गुंतवणुकीचा अंदाज येऊ शकतो. गेल्या आठवड्यात बिटकॉइनच्या मूल्यात घसरण होत असताना देखील सर्वाधिक गुंतवणूकही बिटकॉइनमध्येच करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनमध्ये तब्बल 29.9 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. क्रिप्टोमध्ये वाढत असलेल्या गुंतवणुकीवरून भविष्यात क्रिप्टोमध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

इतर क्रिप्टो करन्सीमध्येही घसरण

प्रमुख क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये तर घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. आज देखील बिटकॉइनच्या दरात घसरण झाली आहे. मात्र बिटकॉइसोबतच इतर क्रिप्टो करन्सीमध्ये देखील मोठी घसरण पहायला मिळत आहे. शनिवारी क्रिप्टो करन्सी इथरचे दर 2.7 टक्क्यांच्या घसरणीसह 1,963.42 डॉलर वर पोहोचले. पॉलकाडॉटच्या दरात तीन टक्के घसरण झाली असून, ते प्रति पॉलकाडॉट 9.68 डॉलरवर पोहोचले आहेत. क्रिप्टो करन्सी सालानाच्या दरात देखील चार टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचे दर 49.89 डॉलर पर्यंत खाली आले आहेत. डॉग कॉइनच्या दरात देखील 2.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.