Digital Currency : घरोघरी डिजिटल रुपया, आता तुमच्याही शहरात लवकर मिळणार

Digital Currency : डिजिटल रुपया नेटाने पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. आंतरराष्ट्रीय मंचावरही भारतीय डिजिटल चलनाचे कौतुक झाल्याने लवकरच आता ही सेवा देशातील प्रत्येक शहरात नेण्यात येईल. सध्या या शहरात ही सेवा सुरु होत आहे.

Digital Currency : घरोघरी डिजिटल रुपया, आता तुमच्याही शहरात लवकर मिळणार
लवकरच सर्वदूर सेवा
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल चलनाचा (Digital Currency) पथदर्शी प्रकल्पाचा नारळ फोडला. त्यानंतर काही बँकांना या प्रकल्पात सहभागी करुन घेतले. डिजिटल रुपयाचा वापर करुन प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुंबईत आरबीआयच्या मुख्य शाखे बाहेरील फळ विक्रेत्याकडून खरेदी ही केली. पहिल्या टप्प्यात देशातील पाच शहरांसह आठ बँकांना या प्रकल्पात सहभागी करुन घेण्यात आले होते. यामुळे केंद्र सरकारसह आरबीआयचाही उत्साह दुणावला आहे. डिजिटल रुपया (Digital Rupee) ठोक आणि किरकोळ स्वरुपात वापरता यावा यासाठी प्रयोग सुरु आहे. आता ही सेवा देशात घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. डिजिटल रुपयाची उत्सुकता आणि त्याचा सहज उपयोग लक्षात घेत आरबीआयने आणखी 9 शहरांतील पाच बँकांमध्ये ही सेवा सुरु करण्याचा संकल्प सोडला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ई-रुपयाचा (E-Rupee) विस्तार करण्यासाठी बुधवारी घोषणा केली. त्यानुसार, ही सेवा आणखी 9 शहरात सुरु करण्यात येत आहे. Digital Rupee च्या दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदुर, कोच्ची, लखनऊ, पाटणा, शिमला यासह इतर शहरांना जोडण्यात येत आहे. ही सेवा लवकरच निम्न शहरात आणि ग्रामीण भागात सुरु करण्यासाठी प्रयत्न होत आहे.

पहिल्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांचा समावेश करण्यात आला होता. आता या प्रकल्पात आणखी चार बँकांचा समावेश करण्यात येत आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा या बँकांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

डिजिटल चलन नुकतेच सुरु करण्यात आले आहे. पण त्याची उपयोगिता, गतिशिलता आणि वापरण्यास सहज सोपे असल्याने वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. RBI ने याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, केंद्रीय बँक डिजिटल चलनाचा (CBDC) वापर वाढला आहे.

देशातील 50,000 वापरकर्ते आणि 5,000 व्यापारी यांनी डिजिटल रुपयाचा वापर सुरु केला आहे. पण डिजिटल रुपयाची लोकप्रियता वाढत आहे. डिजिटल रुपयाची मागणी वाढत आहे. त्यामुळे आरबीआयने यापूर्वी ज्या शहरात डिजिटल रुपया पहिल्या टप्प्यात सुरु केला, त्या ठिकाणच्या बँकांची संख्या वाढविण्याचा आणि वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिसेंबर 2022 मध्ये पहिल्याच दिवशी 1.71 कोटी रुपयांचे डिजिटल चलन जारी केले. पायलट प्रकल्पातील चार बँकांनी या चलनाची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपयाची सुरुवात झाली. चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल चलन उपलब्ध करुन देण्यात आले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.