बंद असलेल्या बँकेच्या खात्यांवरही मिळते व्याज, पैसे काढण्यासाठी असे सुरु करा अकाऊंट

विशेष म्हणजे हे बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची काहीही गरज नसते. (Customer get interest in Inoperative / dormant accounts)

बंद असलेल्या बँकेच्या खात्यांवरही मिळते व्याज, पैसे काढण्यासाठी असे सुरु करा अकाऊंट
-Cash-Counter
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 1:25 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. या काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. वाढता संसर्ग आणि महागाई लक्षात घेता प्रत्येकाला आवश्यक खर्चासाठी पैशांची गरज भासते. अशावेळी तुमचे एखादे बंद पडलेले बँकेचे खाते उपयुक्त ठरत आहेत. विशेष म्हणजे हे बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची काहीही गरज नसते. (Customer get interest in Inoperative / dormant accounts)

कोरोना काळात अनेक बँका तसेच त्यांच्या शाखांमधील कामकाज काही मर्यादित स्वरुपात सुरु आहेत. बँकेतील अनेकांना कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने या संक्रमणापासून बचावासाठी फारच कमी बँकिंग सेवा दिल्या जात आहे. पण तुम्ही घरबसल्या तुमचे बंद पडलेले बँक खाते पुन्हा सुरु करु शकता. ही प्रक्रिया अगदी सोपी असते.

डॉरमेंट अकाऊंट म्हणजे काय? 

जर एखाद्या बँकेचे खात्यात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ व्यवहार केला गेला नसेल तर ते इनऑपरेटिव्ह होते. आरबीआयच्या नियमांनुसार, हे खाते पुन्हा सुरु करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

अकाऊंट डॉरमेंट होणे म्हणजे ते बंद करण्यात आले असा होत नाही. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखादे बँक खाते वापरत नसाल, तर बँक ते अकाऊंट बंद करते. ज्यामुळे ते अकाऊंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता नसते.

अकाऊंट बंद करण्यापूर्वी बँकेकडून ग्राहकाशी संपर्क

जेव्हा एखाद्या बँकेतील खात्यात दोन ते तीन वर्ष कोणत्याही व्यवहार केला जात नाही, तेव्हा ते अकाऊंट इनऑपरेटिव्ह केले जाते. जर तुम्ही वर्षभर व्यवहार केला नाही, तर बँक स्वत: तुमच्याशी संपर्क साधते. जर ग्राहकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर ते खाते डीअॅक्टिव्ह केले जाते. तसेच दहा वर्षे कोणताही व्यवहार केला नाही, तर बँक ते अकाऊंट डॉरमेंट अकाऊंट म्हणून घोषित करते.

मात्र अशाप्रकारे बंद झालेले अकाऊंट पुन्हा सुरु करता येतात. जर एखाद्या ग्राहकाला ते खाते काहीही कामाचे नसेल, तर तो व्यक्ती ते कायमस्वरुपी बंद करु शकतो. मात्र कोणतीही बँक परस्पर कोणतेही अकाऊंट बंद करत नाही.

डॉरमेंट बँक अकाऊंटवर फी आकारली जाते का?  

अनेकदा तुमच्या खात्यात किमान रक्कम शिल्लक नसेल तर बँक ग्राहकांकडून फी आकारते. पण जर तुमचे अकाऊंट इन ऑपरेटिव्ह असेल तर ते पुन्हा सुरु करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 2014 मध्ये आरबीआयने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, इन ऑपरेटिव्ह खात्यात किमान रक्कम शिल्लक नसल्यास बँका ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू शकत नाहीत. तसेच त्यांच्या बँकेच्या अकाऊंटची स्थिती काहीही असली तरी त्यात नियमित व्याज जमा व्हायला हवे.

पुन्हा कसे सुरु कराल?

डॉरमेंट किंवा इनऑपरेटिव्ह अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया फार सोपी असते. यासाठी तुम्हाला फक्त बँकेच्या शाखेला एक मेल करावा लागतो. त्यासोबतच KYC करण्यासाठी ओळखपत्र आणि राहत्या घराचा पुरावा द्यावा लागतो. यानतंर काही दिवसातच तुमचे अकाऊंट पुन्हा सुरु केले जाते. काही बँकामध्ये तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केवायसीची प्रक्रिया केली जाते. (Customer get interest in Inoperative / dormant accounts)

संबंधित बातम्या :

पंतप्रधान जनधन खात्याचे बरेच फायदे; दोन लाखांचा विमाही मिळतो; जाणून घ्या काय काय आहेत फायदे?

PHOTO | पोस्टाच्या ‘या’ स्किममध्ये 5042 रुपये भरा, मग 10 वर्ष चिंता नाही; थेट 7.25 लाख रुपये मिळवा; कसे ते वाचा!

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.