1930- ताबडतोब सेव्ह करा मोबाईलमध्ये हा नंबर; कधी पण पडू शकते गरज, कशासाठी कराल वापर

Cyber Fraud Helpline Number : सायबर फ्रॉड, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. कमी शिक्षण झालेलेच नाही तर मेट्रो शहरात मोठ्या हुद्दावरील अधिकाऱ्यांना पण या प्रकारत चुना लागलेला आहे. अशावेळी तुमच्याकडे 1930 हा क्रमांक असणे गरजेचे आहे. काय आहे हा क्रमांक, कशासाठी होतो त्याचा वापर?

1930- ताबडतोब सेव्ह करा मोबाईलमध्ये हा नंबर; कधी पण पडू शकते गरज, कशासाठी कराल वापर
अगोदर सेव्ह करा हा क्रमांक
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 2:04 PM

भारत गतीने डिजिटल युगाकडे धावत आहे. सध्याच्या काळात अनेक कामे ही घरबसल्या करण्याची सोय उपलब्ध होत आहे. बँक, बुकिंग संबंधीची अनेक कामे आता घरबसल्या होत आहेत. त्यासाठी कार्यालयीन चकरा कमी झाल्या आहेत. डिजिटल इंडिया या मोहिमेमुळे बँकिंग क्षेत्रात क्रांती आली आहे. ऑनलाईन पैसे हस्तांतरीत करणे असो वा, नवीन खाते उघडणे असो. बँकेशी संबंधित अनेक कामे आता झटपट पूर्ण होत आहेत. त्यासाठी बँकेत जाण्याची गरज उरली नाही. या तंत्रज्ञानाचे काही तोटे पण सहन करावे लागत आहेत.

डिजिटल फ्रॉडचे वाढले प्रमाण

गतीने डिजिटल इंडिया होणाऱ्या भारतात ऑनलाईन स्कॅम, फ्रॉड, फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सायबर भामटे ग्राहकांना गंडा घालण्यासाठी युक्त्या वापरत आहेत. सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी ते जाळे टाकतात. त्यांच्या कष्टाचा पैसा अवघ्या काही मिनिटात उडवतात. सायबर फसवणूक ही केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही तर सरकारसाठी पण मोठी डोकेदुखी ठरली आहे. केंद्र सरकार ते राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँके ते तुमची बँक सर्वच जण ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी प्रबोधन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

जवळपास प्रत्येक वर्गाला फटका

सायबर फसवणुकीच्या घटना पाहिल्या असता, या भामट्यांच्या मायाजालात केवळ छोट्या शहरातील, गावाकडील लोक अडकल्याचा दावा पण फोल असल्याचे दिसून येते. या मालाजालात बडे अधिकारी, बडे बाबू, नेते, पुढारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस सुद्धा अडकल्याचे दिसून येईल. त्यांना फसवण्याची युक्ती थोडी वेगळी असते इतकेच. या भामट्यांपासून लोकांना सावध करण्यासाठी आणि त्यांच्या झटपट पाठलागासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. सायबर गुन्हे प्रकरणात नागरीक 1930 हा क्रमांक डायल करु शकतात. अथवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकतात.

मोबाईलमध्ये लागलीच करा सेव्ह क्रमांक

सध्या वाढते ऑनलाईन प्रकरण पाहता 1930 हा एक महत्वपूर्ण मदत क्रमांक ठरु शकतो. हा क्रमांक तातडीने तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवा. ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल. त्यावेळी हा क्रमांक डायल करा. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हे काम केले. तर तुम्हाला लवकर मदत मिळू शकते.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....