Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींची कार चालवत होती मुंबईतील ही फेमस डॉक्टर, कोण आहेत अनाहिता पंडोले

Cyrus Mistry | डॉ. अनाहिता पंडोले यांना रस्त्याच्या बाजूला लावलेल्या होर्डिंग्समुळे गाडी चालवताना अडचण येत होती. या कारणासाठी त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारही केली होती. होर्डिंग हटवण्याची मागणी केली होती.

Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींची कार चालवत होती मुंबईतील ही फेमस डॉक्टर, कोण आहेत अनाहिता पंडोले
कोण आहेत डॉ. अनाहिता पंडोले?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 12:01 PM

Cyrus Mistry | मुंबई जवळ पालघरमध्ये रविवारी झालेल्या रस्ता अपघातात (Road Accident) टाटा सन्सचे पूर्व संचालक सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे निधन झाले. मर्सडिज कार दुभाजकाला धडकल्याने सायरस मिस्त्री आणि अन्य एकाचा मृत्यू झाला. ही कार मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनाहिता पंडोले (Doctor Anahita Pandole) चालावत होत्या. प्राथमिक माहितीच्या आधारे, कार खूप वेगात होती आणि तिने विरुद्ध दिशेने दुसऱ्या गाडीला मागे टाकण्याच्या नादात अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातात डॉ. अनाहिता, त्यांचे पती दरियस वाचले. ते पुढील सीटवर होते. तर त्यांचा भाऊ जहांगीर पंडोले आणि सायरस मिस्त्री मागील सीटवर होते. दोघांचा या अपघातात मृत्यू ओढावला.

कोण आहेत अनहिता?

डॉक्टर अनाहिता पंडोले या मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ होत्या. वंध्यत्व, कठिण काळातील प्रसुति आणि एंडोस्कोपी सर्जरी त्या निषणात होत्या. त्यांनी मुंबईतील जसलोक रुग्णालयातही काम केलेले आहे.

त्यांचे शिक्षण काय

त्या गेल्या 18 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनाहिता पंडोले यांनी एमबीबीएस केल्यानंतर नायर रुग्णालयात सेवा दिली. याच ठिकाणी त्यांनी एमडी ही केली. वंध्यत्व विकार तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती.

हे सुद्धा वाचा

पारसी पंचायतमध्ये कार्यरत

डॉ. अनाहिता पंडोले या जियो पारसी कार्यक्रम आणि पारसी पंचायतीमध्ये कार्यरत होत्या. त्यांचे पतीचे नाव दरीयस पंडोले आहे. ते जेएम फायनांनशिअलमचे सीईओ आहेत. जानेवारी 2004 मध्ये अनहिता पंडोले यांनी बॉम्बे पारसी पंचायतीत सहभाग घेतला.

लोकसंख्या वृद्धीसाठी पुढाकार

त्यांनी पारशी समाजातील घटत्या लोकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी फर्टिलिटी प्रॉजेक्ट ही सुरु केला. त्यामाध्यमातून पारशी विवाहीत जोडप्यांना लोकसंख्या वाढीसाटी मोफत मदत करण्यात येत होती.

होर्डिंगवर नाराजी

डॉ. अनाहिता पंडोले यांना रस्त्याच्या बाजूला लावलेल्या होर्डिंग्समुळे गाडी चालवताना अडचण येत होती. या कारणासाठी त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारही केली होती. होर्डिंग हटवण्याची मागणी केली होती.

दोन दिवसांपूर्वीच केला विरोध

पश्चिम महामार्गाच्या (Western Highway) बाजूला असलेल्या होर्डिंगवर त्यांनी दोन दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेला पत्र लिहिले. तसेच होर्डिंग काढण्याची विनंतीही केली होती.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.