Steel Export : निर्यात शुल्कामुळे स्टीलच्या दरात घसरण; जागतिक बाजारातही मागणी घटली, कंपन्यांसमोर दुहेरी संकट

महागाईचं (inflation) संकट पाहून सरकारनं मे महिन्यात स्टीलवर निर्यात शुल्क लावले आणि कंपन्यांच्या नफ्यात घट झाली. निर्यात शुल्क लावल्यानंतरही थोड्याफार प्रमाणात कंपन्या स्टील निर्यात करून नफा कमावत होत्या. मात्र, जागतिक बाजारात स्टीलच्या किंमती घसरल्यानं निर्यातीला लगाम बसला.

Steel Export : निर्यात शुल्कामुळे स्टीलच्या दरात घसरण; जागतिक बाजारातही मागणी घटली, कंपन्यांसमोर दुहेरी संकट
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 2:10 AM

नवी दिल्ली : घटना खूप जुनी नाही. रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia-Ukraine conflict) जागतिक बाजारात स्टीलच्या (Steel) किंमती गगनाला भिडल्या होत्या.भारतीय कंपन्यांना स्टीलची युरोपमध्ये निर्यात करून नफा कमावण्याची संधी मिळाली. मात्र, वाढत्या महागाईचं (inflation) संकट पाहून सरकारनं मे महिन्यात स्टीलवर निर्यात शुल्क लावले आणि कंपन्यांच्या नफ्यात घट झाली. निर्यात शुल्क लावल्यानंतरही थोड्याफार प्रमाणात कंपन्या स्टील निर्यात करून नफा कमावत होत्या. मात्र, जागतिक बाजारात स्टीलच्या किंमती घसरल्यानं निर्यातीला लगाम बसला.फक्त निर्यातच नव्हे तर देशांतर्गत बाजारात स्टील कंपन्यांचा नफा कमी झालाय. निर्यात शुल्कानंतर स्टीलच्या किमती खूप कमी झाल्यात. सध्याचे दर आणि एप्रिल महिन्यांतील किमतीची तुलना केल्यास किमती 20 टक्क्यानं कमी झाल्यात. म्हणजेच कंपनींसमोर दुहेरी आव्हान आहे. मात्र दुसरीकडे स्टीलच्या कमी झालेल्या दराचा फायदा हा ग्राहकांना मिळत नसल्याचे देखील समोर आले आहे.

ग्राहकांना दिलासा नाहीच

स्टीलच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा ग्राहकांना मिळताना दिसत नाहीये. घर बांधणीसाठी लागणाऱ्या सळी आणि स्टीलच्या किंमती कमी झाल्यात. मात्र, घराच्या किमती स्वस्त होण्याऐवजी वाढतच आहेत. अशाचप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वस्त स्टीलचा फायदा घेऊन उत्पादन खर्च कमी करत आहेत. ग्राहकांना मात्र, कार आणि स्कूटर वाढीव किमतीतच विकत आहेत.ग्राहकांना स्वस्त झालेल्या स्टीलचा फायदा मिळत नाही तसेच जागतिक बाजारात देखील स्टीलचे दर कमी झाल्यानं कंपन्या स्टील निर्यातीवरील शूल्क रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव टाकत आहेत. चर्चा अशीही सुरू आहे की काही कंपन्यांनी निर्यात शुल्क हटवण्यासाठी सरकार दरबारी मोहीम सुरू केलीये. रुपया घसरल्यानं निर्यातीमधून कंपन्यांना नफा कमावण्याची संधी आहे. दरम्यान, सरकार लोह खनिजाच्या निर्यातीवर कर वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी स्टील निर्यातीमध्ये 25 टक्क्यांची वाढ

निर्यातीवर बंदी नसल्यानं गेल्या वर्षी स्टील निर्यात 25 टक्क्यांहून अधिक वाढली होती. रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक स्टील बाजारात पुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे जागतिक बाजारात भारतीय स्टील कंपन्यांना पकड मजबूत करण्याची मोठी संधी आहे. महागाईचं आव्हान असूनही सरकार स्टील निर्यातीला प्रोत्साहन देऊ शकतं. त्यामुळेच सरकार स्टील निर्यातीवरील निर्बंध हटवून कंपन्यांना मदत करू शकते. स्टील निर्यातीवरील निर्बंध हटवले गेल्यास या कंपन्यांना मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.