देशातील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य घटले, या बलाढ्य कंपनीला सर्वाधिक फटका

देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली आहे. या सात कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वाधिक फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 43491.37 कोटी रुपयांनी घसरून 1726714.05 कोटी रुपये झाले.

देशातील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य घटले, या बलाढ्य कंपनीला सर्वाधिक फटका
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 2:59 PM

मुंबई : गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठ्या 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या बाजारमूल्यात एकत्रितपणे 1,32,535.79 कोटी रुपयांची घट झाली आहे. या घटीचा सर्वाधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) व्यतिरिक्त, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचयूएल, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी या कंपन्या टॉप 10 नुकसान झालेल्यांमध्ये समाविष्ट आहेत. तसेच आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एसबीआय (SBI) आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांच्या बाजारमुल्यात मात्र वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी देशांतर्गत सर्वात महागड्या कंपन्यांच्या यादीत अदानी ग्रीन एनर्जीने टॉप 10 मध्ये प्रवेश केला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 43,491.37 कोटीं रुपयांनी घसरून ते 17,26,714.05 कोटी झाले. इन्फोसिसचे बाजार मूल्य 27,953.78 कोटी रुपयांनी घसरून 7,35,611.35 कोटी रुपयांवर आले. एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 27,866.34 कोटींनी घसरून 8,12,338.57 कोटी झाले आणि एचडीएफसीचे बाजारमूल्य 14,631.11 कोटींनी घसरून ते 4,31,028.49 कोटी झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एम-कॅप 9,348.88 कोटी रुपयांनी घसरून 13,39,688.48 कोटी रुपयांवर आले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 7,119.26 कोटी रुपयांनी घसरून 5,05,737.77 कोटी रुपयांवर आले आणि बजाज फायनान्सचे मूल्य 2,125.05 कोटी रुपयांनी घसरून 4,43,685.79 कोटी रुपयांवर आले.

या कंपन्यांना फायदा

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची 84,581.99 कोटींची वृध्दी होउन तिचे मूल्यांकन 4,48,050.99 कोटी झाले. त्याच वेळी, आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 5,559.02 कोटी रुपयांनी वाढून 5,29,739.59 कोटी रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1,249.45 कोटी रुपयांनी वाढून 4,61,848.65 कोटी रुपये झाले. टॉप-10 कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचयूएल, एसबीआय, अदानी ग्रीन एनर्जी, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी यांचा क्रमांक लागतो.

शेवटच्या आठवड्यात सेन्सेक्स 1,108.25 अंकांनी तसेच 1.86 टक्क्यांनी घसरला होता. गेल्या आठवड्यात केवळ तीन दिवस शेअर बाजारात व्यवहार झाले. यानंतर गुरुवारी महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद होता.

संबंधित बातम्या 

jet fuel prices hike: विमान इंधनाच्या दरात वाढ; प्रवास महागण्याची शक्यता

Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.