नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : एअरोस्पेस आणि डिफेंस सेक्टरशी संबंधित या कंपनीने ग्राहकांना लॉटरी लावली. या कंपनीच्या शेअरने बुधवारी बाजारात कमाल केली. कंपनीचा शेअर बुधवारी 12 टक्क्यांनी वधारला. हा शेअर सध्या 76.45 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीने बाजारात गेल्या 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला आहे. गेल्या एका महिन्यात डिफेंस कंपनीच्या शेअरमध्ये 33 टक्क्यांची तेजी दिसून आली. या कंपनीचा 52 आठवड्यांतील निच्चांक 20.70 रुपये आहे. दोनच वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना लखपती केले आहे. कोणता आहे हा स्टॉक?
2 वर्षांत 537 टक्क्यांची उसळी
अपोलो मायक्रो सिस्टम्सचा (Apollo Micro Systems) शेअर गेल्या दोन वर्षांत चमकला आहे. दोन वर्षांत या शेअरने चमकदार कामगिरी बजावली आहे. कंपनीचा शेअर 17 डिसेंबर 2021 रोजी 11.40 रुपयांवर होता. अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअरने 18 ऑक्टोबर 2023 रोजी 76.45 रुपयांवर मजल मारली. गेल्या दोन वर्षांत या शेअरने 537 टक्क्यांची रॉकेट भरारी घेतली. तर गेल्या एका वर्षांत कंपनीचा शेअर 219 टक्क्यांनी वधारला आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्सचा शेअर 19 ऑक्टोबर 2022 रोजी 22.80 रुपयांवर ट्रेड करत होता. एकाच वर्षात त्याने 76.45 रुपयांवर झेप घेतली.
नवीन प्रकल्पाची तयारी
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, हार्डवेअर डिझाईनिंग, व्हिपन इंटिग्रेशन आणि प्लॅटफॉर्म इंटिग्रेशन व्यवसायात ही कंपनी आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्सने गेल्या काही दिवसांपासून डिफेंस इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लँट तयार करण्याची घोषणा केली. या नवीन प्रकल्पात कंपनी 150 कोटींची गुंतवणूक करणार आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्स प्लँटची येत्या नऊ महिन्यात उभारणी होईल.
डिफेंस सेक्टरसाठी स्वतंत्र कंपनी
अपोलो मायक्रो सिस्टम्सने संरक्षण क्षेत्रात नाव कमविण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र कंपनी तयार केली आहे. या कंपनीचे नाव अपोलो डिफेंस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. अपोलो डिफेंस इंडस्ट्रीज डिफेंस, एअरोस्पेस आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं तयार करण्याचे काम करत आहे. ही कंपनी अजून चांगली कामगिरी करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.