DigiYatra App: …आता विमानतळावर कोणत्याही मनस्तापशिवाय होणार प्रवेश; मोबाईलमधील एकाच ॲपने होणार सर्व कामं

सध्या, Digiyatra App वापरणे पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्या प्रवाशांना ते वापरायचे आहे ते ते डाउनलोड करू शकतात. नोंदणीसाठी प्रवाशांना आधार तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय, त्यांना कोविड-19 लसीकरणाबाबत माहितीसह सेल्फी अपलोड करणे गरजेचे असणार आहे.

DigiYatra App: ...आता विमानतळावर कोणत्याही मनस्तापशिवाय होणार प्रवेश; मोबाईलमधील एकाच ॲपने होणार सर्व कामं
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 4:09 PM

नवी दिल्लीः दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) कडून नुकताच एका निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे की, मोबाईलमधील ॲपच्या मदतीने, चेहऱ्याच्या ओळखीच्या आधारावर सर्व चेकपॉईंटवर प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी या ॲपवरूनच प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर, टी 3 टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी हे सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशीच विमानाने प्रवास करणाऱ्यांना यावेळी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. दिल्ली विमानतळ आणि बंगळुरू विमानतळाच्या देशांतर्गत प्रवाशांच्या चेहऱ्याच्या ओळखीसाठी (Digiyatra App)’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपमुळे प्रवाशांची विमानतळावर होणाऱ्या सर्व त्रासांपासून सुटका होणार आहे. सध्या या ॲपचे बीटा व्हर्जन लाँच करण्यात आले आहे आणि लवकरच ते फुल स्केलवर ऑफर केले जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली विमानतळाच्या या टर्मिनलपासून सुरुवात

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने एका निवेदनात म्हटले आहे की, या ॲपच्या साहाय्याने चेहऱ्याच्या आधारावर प्रवाशांची प्रवेश सर्व चेकपॉईंटवर केले जाणार आहेत. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी या ॲपवरूनच प्रवेश दिले जाणार आहेत. दिल्ली विमानतळावर, T3 टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी बे ॲप सुरू करण्यात आले आहे. एअर एशिया इंडिया, एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट आणि विस्तारा या टर्मिनलवरून हे ॲप चालणार आहे.

ॲपलच्या iOS प्लॅटफॉर्मवरही हे ॲप

बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) कडून त्यांच्या एका वेगळ्या निवेदनामध्ये Digiyatra बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टमच्या बीटाची विस्तारा आणि एअर एशिया फ्लाइट्सवर चाचणी घेण्यात आली आहे. तर त्यांनी सांगितले की, Digiyatra App ची बीटा आवृत्ती Android OS साठी Play Store वर उपलब्ध आहे. ॲपलच्या iOS प्लॅटफॉर्मवरही हे ॲप पुढील काही आठवड्यांत उपलब्ध होणार आहे.

हे ॲप वापरणे सुरक्षित आहे

DIAL कडून जाहीरपणे सांगण्यात आले आहे की, हा एक बायोमेट्रिकचा अखंड प्रवासाचा आहे जो चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय विमानतळावर प्रवेश मिळवून देणे हा या पाठीमागचा उद्देश्य आहे. त्याच वेळी, BIAL ने सांगितले की या अॅपच्या मदतीने, प्रवाशांना यापुढे विमानाने प्रवास करण्यासाठी जवळ कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. आता प्रत्येक चेक पॉइंटवर बायोमेट्रिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांची ओळख पटवली जाणार असून ही सगळी प्रक्रिया देखील अतिशय सुरक्षित आहे.

याप्रमाणे नोंदणी करा

सध्या, Digiyatra App वापरणे पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्या प्रवाशांना ते वापरायचे आहे ते ते डाउनलोड करू शकतात. नोंदणीसाठी प्रवाशांना आधार तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय, त्यांना कोविड-19 लसीकरणाबाबत माहितीसह सेल्फी अपलोड करणे गरजेचे असणार आहे.

delhi-and-bengaluru-airports-launches-digiyatra-app-beta-version-for-face-recognition-seamless-entry

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.