Godrej : भाऊबंदकीत ‘गोदरेज’ पण हारली; 127 वर्षांपूर्वी अशी झाली होती सुरुवात

देशातील दिग्गज व्यावसायिक कुटुंबांमध्ये टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी आणि गोदरेज यांचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येते. गोदरेज समूहाचे नाव समोर येताच आपल्यासमोर सर्वात अगोदर कुलूप येते. पण एका वृत्तानुसार, 127 वर्ष जुन्या गोदरेज समूहात वाटेहिस्से सुरु झाले आहेत. काय आहे याविषयीची अपडेट...

Godrej : भाऊबंदकीत 'गोदरेज' पण हारली; 127 वर्षांपूर्वी अशी झाली होती सुरुवात
गोदरेजमध्ये वाटेहिस्से
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 2:27 PM

भारतातील डझनभर अशा कंपन्या आहेत, त्यांची यशोगाथा अनेक नवउद्योजकांना प्रेरणा देतात. या कंपन्या स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यांनी अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना करत उद्योगाचे रोपटे लावले. त्याचा वेलू आज गगनावरी गेला आहे. कुटुंबकबिल्याने सुरु केलेल्या या उद्योगांना अशात वाटणीचा मोठा शाप लागला आहे. गावखेड्यात भाऊबंदकीचा शाप असतो, तसा भारतातील काही दिग्गज उद्योगांना पण भाऊबंदकीचा शाप लागत आहे. त्यात आता गोदरेजच पण नाव आलं आहे. गोदरेजमध्ये लवकरच वाटेहिस्से होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विभाजनाची प्रक्रिया सुरु झाल्याचे समोर येत आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.

127 पूर्वी झाली होती सुरुवात

देशातील दिग्गज व्यावसायिक कुटुंबांमध्ये टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी आणि गोदरेज यांचे नाव समोर येते. गोदरेज समूहाचे नाव समोर येताच आपल्यासमोर सर्वात अगोदर कुलूप येते. कुलूपापासून सुरु झालेला हा प्रवास अनेक उत्पादनापर्यंत येऊन ठेपला आहे. आता या वटवृक्षावर वाटे हिस्स्यासाठी कुऱ्हाड चालणार आहे. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात काही वर्षांपूर्वी वाटणी झाली होती. ही प्रक्रिया मोठी किचकट आहे.

हे सुद्धा वाचा

सध्याची अपडेट काय?

मीडियातील वृत्तानुसार, आदि आणि नादिर गोदरेज या वर्षाच्या सुरुवातीला गोदरेज अँड बॉयस या मंडळाचा राजीनामा दिला होता. तर जमशेद गोदरेज जीसीपीएल आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या मंडळावरुन बाजूला झाले. कोणत्याही वाद-विवादाशिवाय दोन्ही कुटुंब वाटणीच्या पक्षात आहेत. एका बाजूला आदि आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज तर दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा हे आहेत.

अशी आहे व्यवसायाची जबाबदारी

सध्या गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स, त्याचे नेतृत्व आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ करो. तर दुसरीकडे गोदरेज अँड बॉयसचे नेतृ्व जमशेद गोदरेज आणि त्यांची बहिण करते. आदि आणि नादिर गोदरेज हे गोदरेज अँड बायसमधील त्यांचा वाटा दुसऱ्या गटाला विक्री करतील. तर जमशेद गोदरेज आणि त्यांचे कुटुंब गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्समधील वाटा भावाच्या नावावर करतील.

किती मोठा आहे समूह?

गोदरेज समूहाकडे सध्या 5 सूचीबद्ध कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्टस, गोदरेज ॲग्रोवॅट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाईफ सायन्सेज यांचा समावेश आहे. सध्या या समूहाचे एकूण मूल्य 2.34 लाख कोटी रुपये आहे. कुटुंबातील पाच सदस्य, आदि गोदरेज, नादिर गोदरेज, जमशेद गोदरेज, स्मिता कृष्णा गोदरेज आणि रिशद गोदरेज यांच्याकडे G&B मध्ये प्रत्येकी 15.3% हिस्सेदारी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.