मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या फंडमधून प्रमुख इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी आता ७०० कोटी रुपये गुंतवणुकीची योजना तयार करत आहे. यामुळे कंपनी आपल्या इलेक्ट्रिक डिलिव्हरी आणि कार्गो व्हेईकल प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत होणार आहे. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सरकारने डिलिव्हरी आणि कारगो फ्लीट पूर्णता इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित करण्याचं लक्ष्य ठेवलंय. सरकारच्या या मिशनमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी साथ देणार आहेत. परंतु, ते स्वतः पडद्याआडून मदत करणार आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडून फंडेड एक इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी ७०० कोटी गुंतवणुकीचा प्लॅन करत आहे.
ऑल्टग्रीन प्रोपल्शन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड ७०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याच्या योजनेवर काम करत आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक कारगो व्हेईकल तयार करते. देशातील सामान डिलिव्हरी करण्यासाठी वापरले जातात. ई कॉमर्सच्या विस्तारानंतर देशात अशा व्हेईकल्सची मागणी वाढणार आहे.
ऑल्टग्रीन प्रोपल्शन यावेळी ३५ कोटी डॉलर (सुमारे २८९० कोटी रुपये) व्हॅल्युएशनवर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात माहिती असणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, या फंडिंग राऊंडमध्ये कंपनीचे काही गुंतवणूकदार आपला हिस्सा विक्री करू शकतात. तसेच काही आपले शेअर वाढवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
कंपनीची ही प्लॅनिंग खूप सुरुवातीची आहे. येणाऱ्या काळात फंड जुळवण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार, ऑल्टग्रीन प्रोपल्शनचे सीईओ अमिताभ सरन यांच्याकडून फंड जुळवण्याच्या प्लॅनला होकार दिला आहे. कंपनी जुलैपर्यंत फंड जुळवण्याचे काम पूर्ण करू शकते.
ऑल्टग्रीनची स्थापना २०१३ मध्ये झाली. ही कपंनी इलेक्ट्रिक कारगो व्हेईकलची डिझाईन तसेच मॅन्यूफॅक्चरींग करणार आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार, वार्षिक ५५ हजार इलेक्ट्रिक ३ व्हीलर कारगो व्हेईकलचे प्रोडक्शन करते. कंपनीने गेल्या वर्षी ए-सीरीज राऊंडची फंडिंग जमा केली. यातून कंपनीने ३ अरब रुपये मिळवले.
ए-सीरीज राऊंडमध्ये ऑल्टग्रीन प्रोपल्शनने सेंस वेंचर्स, रिलायन्स गृपची रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, एक्सपोनेंशिया कॅपिटल पार्टनर्स, मोमेंटम वेंचर कॅपिटल आणि एक्युरेट इंटरनॅशनलने कंपनीत गुंतवणूक केली होती. रियायन्स इंडस्ट्रीज कंपनीने सुमारे ५० कोटी रुपये गुंतवले होते. रिलायन्सने गुंतवणूक १०० रुपयांच्या फेस व्हॅल्यूवाली ३४ हजार कंपल्सरी कन्वर्टिबल प्रिफरन्स शेअर्सच्या बदल्यात केले होते.
नवीन फंडिंग झाल्यानंतर कंपनीने आपला फोकस प्रोडक्शन कॅपेसिटी वाढवण्यावर राहील. याशिवाय कंपनी सर्व्हिस आणि रिटेल नेटवर्क मजबूत करेल.