मारुती सुझुकीच्या वाहनांची मागणी वाढली; सेमीकंडक्टरची समस्या दूर झाल्यास अधिक उत्पादन शक्य
देशातील प्रमुख कार निर्मिती कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki) दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या वाहनांची (vehicles) मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवस देशात सेमीकंडक्टरचा (Semiconductor) तुटवडा जाणवत होता. सेमीकंडक्टरच्या अभावी उत्पादनाला काहीप्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र लवकरच ही समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशातील प्रमुख कार निर्मिती कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki) दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या वाहनांची (vehicles) मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवस देशात सेमीकंडक्टरचा (Semiconductor) तुटवडा जाणवत होता. सेमीकंडक्टरच्या अभावी उत्पादनाला काहीप्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र येणाऱ्या काळात सेमीकंडक्टरचा तुटवडा दूर होण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवडा दूर झाल्यास पुन्हा एकदा वाहनांचे उत्पादन पुर्ववत होऊ शकते. देशात वाहनांची मागणी वाढल्याने मागणीच्या तुलनेत वाहनांचे उत्पादन करणे हे कंपनीचे प्रमुख उद्दष्ट असल्याचे एमएसआईचे निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेनिची आयुकावा यांनी म्हटले आहे. जर येणाऱ्या काळात सेमीकंडक्टरचा तुटवडा दूर झाला तर वाहन विक्रीला 2018-19 च्या स्थरावर पोहोचविण्याचे आमचे उद्दष्ट असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. 2018-19 या वर्षात कंपनीच्या 18.62 लाख वाहनांची विक्री झाली होती. तर 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीच्या केवळ 13.18 वाहनांचीच विक्री झाली आहे.
भविष्यात विक्री वाढण्याचा विश्वास
आय़ुकावा पुढे बोलताना म्हणाले की, कोरोना संकटामुळे देशात सेमीकंडक्टरच्या चीपचे उत्पादन कमी झाले आहे. सेमीकंडक्टरचा नियमित पुरवठा होत नसल्याने त्याचा परिणाम वाहन निर्मितीवर झाला आहे. वहान निर्मिती कमी होत असल्याने परिणामी विक्रीचे आकडे देखील खाली आले आहे. मात्र भविष्यात हे चित्र सुधारेल अशी अपेक्षा असून, सेमीकंडक्टरची समस्या दूर झाल्यास आम्ही लवकरच वाहनविक्रीमध्ये 2018-19 चा स्थर गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले असून, सरकारने चांगले बजेट सादर केले ज्याचा उपयोग हा भविष्यात व्यवसायाच्या वाढीसाठी होऊ शकतो असे म्हटले आहे.
वाहनांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता
महागाईमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच देशात सेमीकंडक्टर साधनांचा तुटवडा असल्याने वाहन निर्मिती कमी होत आहे. मात्र मागणी अधिक असल्याने येणाऱ्या काळात वाहनांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही वाहन कंपन्यांनी या आधीच आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट आहे. त्याचा देखील मोठा फटका हा वाहन उद्योगाला बसला आहे.
संबंधित बातम्या
सावधान! स्टार्ट अप कंपन्यांत गुंतवणूक करताय ? मग त्यापूर्वी हे वाचाच