Demat Account : डीमॅट अकाऊंटचा वापर झाला कमी, मग खाते करा असे बंद

Demat Account : जर तुम्ही अनेक दिवसांपासून डीमॅट खात्याचा वापर करत नसाल तर ते बंद करणेच फायदेशीर ठरते. डीमॅट खाते बंद करण्याची प्रक्रिया सोपी आहे. काय आहे ही प्रक्रिया?

Demat Account : डीमॅट अकाऊंटचा वापर झाला कमी, मग खाते करा असे बंद
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 10:09 PM

नवी दिल्ली : बँकेत पैसे जमा करण्यासाठी डीमॅट खात्याचा (Demat Account) वापर होतो. शेअर बाजारात शेअर खरेदी विक्रीसाठी डीमॅट खात्याचा जसा वापर होतो. शेअर खरेदीसाठी लागणारी रक्कम डीमॅट खात्यात जमा होते. तर डीमॅट खात्यातील रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करता येते. शेअर बाजारात (Share Market) पैसा लावण्यासाठी अर्थातच तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. कोरोना काळानंतर शेअर बाजारात गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. आकड्यानुसार, देशात डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटींच्या वर पोहचली आहे. वार्षिक आधारावर डीमॅट खात्यांच्या संख्येत 31 टक्क्यांची वाढ दिसून आली. परंतु, काहींनी उत्साहाने अनेक ब्रोकरकडून विविध डीमॅट खाते उघडली आहेत. पण त्याचा वापर त्यांनी कधीच केला नाही. अथवा शेअर बाजाराविषयी शिकविणारे अनेक गुरु सध्या बाजारात आले आहेत. ते गुंतवणूकदारांना फ्री डीमॅट खाते उघडण्याची गळ घालतात. त्यामुळेही अनेकांनी एकापेक्षा डीमॅट खाती उघडली आहेत. पण ज्या खात्याचा वापर होत नाही, ते खाते बंद करणे फायदेशीर आहे. वापरात नसलेली डीमॅट खाती बंद (Demat Account Closing) केली पाहिजे.

जर तुम्ही डीमॅट खात्याचा वापर करत नसाल तर ही खाती बंद करणे आवश्यक आहे. एका पेक्षा अधिक खात्याची आवश्यकता नसते. पण एखाद्याला दोन-तीन डीमॅट खाते योग्य वाटतात. पण त्याहून अधिक डीमॅट खाती असल्यास तुम्ही ती बंद करावीत. नाहक ही खाती सुरु करण्याची आवश्यकता नाही.

डीमॅट अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला एनएसडीएलच्या (NSDL) संकेतस्थळावरील DP (Depository Participants) मध्ये जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला खात्याशी संबंधित काही आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज जमा करावा लागेल. डीमॅट अकाऊंट बंद करण्याचा अर्जही तिथेच उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच तुम्ही हा अर्ज Depository Participants च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता. अर्जात योग्य माहिती भरल्यानंतर अर्ज कार्यालयात जमा करा. खाते बंद करताना तुमचा DP ID आणि क्लाईंट आयडी द्यावा लागेल. तुमचे नाव, पत्ता यासह इतर तपशीलही भरावा लागेल.

डीमॅट खाते बंद करताना खाते का आणि कशासाठी बंद करत आहात, याचे कारण द्यावे लागेल. डीमॅट खात्याचा क्लोजर रिक्वेस्ट फॉर्मही जमा करणे अनिवार्य आहे. त्यानंतर खात्यात जमा पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करण्याची माहितीही तुम्हाला द्यावी लागेल.

डीमॅट खाते बंद करण्याची विनंती केल्यानंतर तुमचे खाते एकूण दहा दिवसांच्या आत बंद करण्यात येते. डीमॅट खाते बंद करण्यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. ही सेवा पूर्णतः निशुल्क आहे. तुमच्या खात्यात काही रक्कम असेल तर विहित तपशीलाप्रमाणे ती बँक खात्यात जमा होते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....