बँक खात्यात निगेटिव्ह बॅलन्स आहे? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

बँक खात्यातील बॅलन्स निगेटिव्ह असेल, तर वेगवेगळ्या बँकेचे नियमही वेगवेगळे आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर बँक तुमच्याकडून दंड आकारु शकते. (negative balance bank account)

बँक खात्यात निगेटिव्ह बॅलन्स आहे? जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 8:15 AM

मुंबई : कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. परिणामी ईएमआय भरणे, तसेच नियमित व्यवहार करणंही जिकरीचं होऊन बसलं आहे. कित्येकांना कर्जाचे नियमित हफ्ते फेडणे कठीण झालं आहे. तर अनेक खातेदारांच्या बँक खात्यातील बॅलन्स निगेटिव्ह झालं आहे. मात्र, बँक खात्यातील बॅलन्स निगेटिव्ह असेल, तर वेगवेगळ्या बँकेचे नियमही वेगवेगळे आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर बँक तुमच्याकडून दंड आकारु शकते. त्यामुळे हे नियम जाणून घेणे गरजेचं आहे. (detail information of negative balance and bank account)

बँक खातं निगेटिव्ह कधी होतं?

खात्यात पैसै नसतील तर ईएमआयसंदर्भातील रिक्वेस्ट्स बाऊंस होतात. परिणामी बँकेकडून शुल्क आकारले जाते. हे शुल्क सामान्यत: 250 ते 500 रुपयांपर्यंत असते. सरकारी बँकांमध्ये हे शुल्क कमी असते. खातेदार बँकेचे लोन फेडण्यास असमर्थ ठरला तर बँकेकडून ते खातं निगेटिव्ह अकाउंट म्हणून घोषित केले जाते.

निगेटिव्ह बँक खातं म्हणजे काय?

बँक खातं निगेटिव्ह होणे म्हणजे काय?, याबद्दल अ‌ॅक्सिस बँकेचे अध्यक्ष रवी नारायण (हेड ब्रँच, रिटेल लायबलिटीज अँड प्रोडक्ट) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय नियमांनुसार ज्या खातेदारांचा दंड बँकेने माफ केलेला आहे, त्या खातेदारांचे अकाउंट बंद करता येते. निगेटिव्ह बॅलन्स असणाऱ्या खातेदाराला एका वर्षाची मुदत देण्यात येते. त्यानंतर ते बँक खाते इनअ‌ॅक्टिव्ह किंवा डॉरमन्ट समजले जाते. तसेच, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्या खात्यावर कुठलेही कर्ज  नाही, किंवा कुठलेही क्रेडीट ट्रांजेक्शन झालेले नसेल तेच अकाउंट बँकेला बंद करता येते. कोणतेही खाते बंद करण्याआधी खातेदाराच्या व्यवहाराचा पूर्ण अभ्यास करणेही बँकेला बंधनकारक असते.

डॉरमन्ट अकाउंट काय आहे?

ज्या बँक खात्यात 24 महिन्यांपर्यंच कोणतेही ट्राजेक्शन झालेले नाही, त्या बँक खात्याला इनऑपरेटिव्ह किंवा डॉरमन्ट म्हणून घोषित केले जाते. तसेच, ज्या बँक खात्यात 12 महिन्यांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, ते बँक खाते इनअ‌ॅक्टिव्ह म्हणून घोषित केले जाते.

बँक खातं बंद करण्यासाठी बँकेचे नियम काय?

बँक खातं बंद करायचं असेल, तर वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. खातेदाराने 14 दिवसांच्या आत बँक खाते बंद केल्यास एचडीएफसी बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. तर सहा महिन्यांसाठी 500 आणि 1 वर्षाच्या आत खाते बंद करायचे असल्यास एचडीएफसी बँकेकडून 250 रुपये आकारले जातात. कोटक महिंद्रा बँक 31 ते 181 दिवसांच्या कालावधित बँक खाते बंद केले तर बँक 600 रुपये आकारते. तर 15 दिवस ते 1 वर्षाच्या काळात बँक खाते बंद करायचे असेल तर अ‌ॅक्सिस बँकेकडून 500 रुपये आकारले जातात. 30 दिवसांच्या आत बँक खाते बंद करायचे असेल तर आयसीआयसीआय बँक कोणतेही शूल्क आकारत नाही. मात्र, 31 दिवस ते 1 वर्षापर्यंत बँक खाते बंद करायचे असेल तर खातेदारांना 500 रुपये द्यावे लागतील.

संबंधित बातम्या :

शेवटच्या क्षणी ITR फाईल करताय? स्टेट्स जाणून घेण्यासाठी सोप्या टिप्स

Gold Silver Price Today : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी; असे आहेत आजचे दर

सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?

(detail information of negative balance and bank account)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.