Gold : दिवाळीपूर्वीच सोने तेजीत..दिवाळीत सोन्याचा भाव होणार इतका की..
Gold : दिवाळीपूर्वीच सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा तेजी आली आहे.. दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव इतके वाढण्याची शक्यता आहे..
नवी दिल्ली : धनत्रयोदशीपूर्वी सोने लकाकणार आहेत तर चांदी चमकणार आहे. सध्या सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price) तेजीत आहेत. मध्यंतरी भाव कमालीचे घसरले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी (Investors) खरेदी केली. पण आता सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या असून दिवाळीपर्यंत (Diwali) त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यापासून भाव सातत्याने वाढत आहे. त्यात डॉलर मजबूत स्थिती आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येईल.
IIFL Securities चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सोन्यात अजूनही तेजी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 2.03 टक्क्यांची तेजी आली आहे. ते 1693 डॉलर प्रति औसवर बंद झाले आहे. तर स्थानिक वायदे बाजारात सोन्यात 3.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. सोन्याचा भाव 51960 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला आहे.
चांदीचे दर ही वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत 5.84 टक्क्यांची तेजी दिसून आली. चांदी 20.11 डॉलर प्रति औसवर बंद झाली. स्थानिक वायदे बाजारात (MCX) वर चांदी 4 महिन्यांच्या उच्चस्तरावर विक्री होत आहे. चांदीचे भाव प्रति किलो 60785 रुपये आहेत.
दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 53 हजार रुपये होईल तर चांदीचा भाव 63 रुपये होण्याची आशा आहे. चांदीचा दर 65 हजार रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञानुसार, वायदे बाजारात तेजीसाठीचे प्रमुख कारणे समोर आहेत. आंतरराष्ट्रीय परिणाम दिसून येत असल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतीवर दिसून येईल. कच्चा तेलाचे दरही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.