सिंगापूरच्या धरतीवर धारावीचे रुपडे बदलणार, गौतम अदानी यांचा प्लॅन काय

Dharavi | आशियातील सर्वात मोठ्या झोपट्टीपटीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सिंगापूरसारखा लूक देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. धारावी जवळपास 600 एकरावर ऐसपैस पसरली आहे. ती आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अदानी समूहाने धारावीला नवीन लूक देण्यासाठी अमेरिकेतील Sasaki कंपनीला काम दिले आहे.

सिंगापूरच्या धरतीवर धारावीचे रुपडे बदलणार, गौतम अदानी यांचा प्लॅन काय
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 9:48 AM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : गौतम अदानी मुंबई आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला सिंगापूरसारखे करणार आहे. त्यांच्या कंपनीला आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या विकास कामाचं कंत्राट मिळालं आहे. धारावीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अदानी समूहाने जगातील नामवंत आणि निष्णात कंपन्यांना सोबत घेतलं आहे. त्यासाठी नियोजन आणि सुरेख आखणीचे काम करण्यात येत आहे. अमेरिकेची डिझायनिंग कंपनी Sasaki, इंग्लंडची कन्सल्टन्सी फर्म Buro Happold आणि आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहकार्याने पूनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

अशी होईल धारावी

न्यूज 9 प्लस शोला दिलेल्या खास मुलाखतीत या प्रकल्पाच्या प्रमुखाने प्रोजेक्ट धारावीबद्दल माहिती दिली. त्यानुसार, हा प्रकल्प गेम-चेंजर ठरेल. या परिसरातील लाखो लोकांचे आयुष्य हा प्रकल्प बदलून टाकेल. त्यासाठीच्या कामावर आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
  1. आयुष्य पालटणार : मुंबईत अर्ध्याहून अधिक लोक झोपडपट्टीत राहतात. अदानी समूह धारावीचे रुपडे पालटणार आहे. येथील लाखो लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. हा एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. भविष्यात झोपडपट्टींचा विकास करण्याचे एक मॉडेल ठरणार आहे. त्यांचा पूनर्विकासाचा हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.
  2. धारावीतील लोकांना हा फायदा : कंत्राटदारानुसार, भरपूर सूर्यप्रकाश आणि व्हेंटिलेशनची सुविधा या घरांना असेल. येथील घनकचरा व्यवस्थापन आणि व्यावसायिक वापरासाठी चांगली, प्रशस्त जागा, दुकाने धारावीकरांना मिळणार आहे.
  3. सर्वात मोठं आव्हान : धारावीत अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांचा पसारा पसरलेला आहे. अनेक लघुउद्योग सुरु आहेत. त्यांना योग्य जागा उपलब्ध करुन देणे. त्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन, बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे मोठे आव्हान आहे. सर्वात मोठे आव्हान हे सार्वजनिक स्वच्छता, शौचालये, कचऱ्या विल्हेवाट लावणे याबाबतचे आहे.
  4. काय असेल नाव : याप्रकल्पासाठी सिंगापूर हे मॉडेल समोर ठेवण्यात आले आहे. पूनर्विकास झाल्यानंतर या जागेचे नाव बदलण्याचा विचार नसल्याचे समोर येत आहे. 1960 च्या दशकात सिंगापूरची अवस्था अशीच होती. त्यामुळे या प्रकल्पासाठी सिंगापूरच्या धरतीवर विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
  5. धारावी ठरणार मास्टरपीस : धारावीत 8.5 लाखांहून अधिक लोक राहतात. म्हणजे प्रति वर्ग किमीमध्ये 354,167 लोक राहतात. ही जगातील सहावी सर्वात दाट वसाहत आहे. यामध्ये गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लोक राहतात. या ठिकाणी 6,000 अधिक लघुउद्योग सुरु आहेत. या योजनेनंतर धरावी पूनर्विकासाचे मास्टरपीस ठरेल.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.